news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक पंढरपुरात ; 11 हेक्टर जागेवर उभारलेल्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार लोकार्पण 

टीम लोकमन by टीम लोकमन
July 16, 2024
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक पंढरपुरात ; 11 हेक्टर जागेवर उभारलेल्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार लोकार्पण 

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटांचे भव्यदिव्य असे ‘चंद्रभागा यात्रा बसस्थानक’ व त्याला जोडूनच एक हजार भाविक क्षमतेचे यात्री निवास उभारण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे पंढरपूरमध्ये अद्ययावत बसस्थानक असून या स्थानकातून शेकडो बस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने-आण करीत असतात. मात्र आषाढी आणि कार्तिकीसारख्या मोठ्या यात्रांसाठी ते बसस्थानक अपुरे आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटांचे भव्य ‘चंद्रभागा यात्रा बस स्थानक’ उभारले आहे.

तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविकांची निवासाची अल्प दरात सोय व्हावी, यादृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे एक हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी दोन सुसज्ज उपहारगृहे सुद्धा बांधण्यात आली आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या समारंभाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

आषाढी आणि कार्तिक यात्रांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी या बस स्थानकावरून राज्यभरातील विविध ठिकाणी एसटी बस सोडण्यात येणार आहेत. येथे एसटीच्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून याबरोबरच सुमारे १ हजार भाविकांची निवाऱ्यासाठी यात्री निवास बांधण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालदिंडी व रिंगण सोहळा चैतन्यमय वातावरणात संपन्न ; बालचमुंच्या अलौकिक रुपात साक्षात अवतरली पंढरी

Next Post

अवघी दुमदुमली बोराळे नगरी ! आषाढीच्या पार्श्वभूमीवर नूतन हायस्कूल मधील बाल वैष्णवांच्या दिंडीने बोराळे गावातील वातावरण भक्तीमय

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group