news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

लोकसभा निवडणूक 2024 ! सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

टीम लोकमन by टीम लोकमन
June 3, 2024
in ताज्या घडामोडी
0
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची मरवडे नगरीत जय्यत तयारी, गुलाब पुष्पाने होणार मतदारांचे स्वागत ; ग्रामसेविका राखी जाधव

 

टीम लोकमन सोलापूर |

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 4 जून रोजी रामवाडी येथील शासकीय गोदामात होत असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी दिली.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघांची मतमोजणी रामवाडी गोदाम येथे होणार आहे. सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल.


निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. प्रसार माध्यम कक्षात टेलिफोन, फॅक्स मशिन, इंटरनेट, टीव्ही आदी आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. सोलापूर लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया 108 टेबलद्वारे होणार आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल आणि 24 फेऱ्या, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 20 फेऱ्या, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 27 फेऱ्या, अक्कलकोट विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 27 फेऱ्या, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 26 फेऱ्या तर पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 25 फेऱ्या होणार आहेत. तसेच ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 14 व पोस्टल मतमोजणी साठी 8 टेबल लावण्यात येणार आहेत.मतमोजणी प्रक्रियेसाठी 404 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.


माढा लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया 130 टेबलद्वारे होणार आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल आणि 25 फेऱ्या, माढा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल आणि 25 फेऱ्या, सांगोला विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 22 फेऱ्या, माळशिरस विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 25 फेऱ्या, फलटण विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 25 फेऱ्या तर माण विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल 27 फेऱ्या होणार आहेत. तसेच ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 20 व पोस्टल मतमोजणी साठी 26 टेबल लावण्यात येणार आहेत.मतमोजणी प्रक्रियेसाठी 513 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.


सोलापूर लोकसभा मतदार संघात 2729 दिव्यांग मतदार आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक,भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील 782 भारतीय सैनिक मतदार असे एकूण 3 हजार 511 मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. तसेच माढा लोकसभा मतदार संघात 5134 दिव्यांग मतदार आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक,भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या ए‍क हजार 832 भारतीय सैनिक मतदार असे एकूण 6 हजार 971 मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार सदर मत मोजणी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रावर अधिकारी,कर्मचारी व उमेदवार प्रतिनिधी यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी केले.

Previous Post

राम सातपुते की प्रणिती शिंदे ! उद्या होणार फैसला ; कोण मारणार बाजी, सोलापूरच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

Next Post

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माडग्याळ येथील वेदिका खरात हिचे उज्वल यश

Next Post
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माडग्याळ येथील वेदिका खरात हिचे उज्वल यश

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माडग्याळ येथील वेदिका खरात हिचे उज्वल यश

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group