news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

ऐकावं ते नवलचं ! आजीबाईंना टीव्ही सुरू केल्यावर दिसत होता साप, चॅनेल बदलले तरीही साप जात नव्हता ; नंतर समोर आले धक्कादायक सत्य, अजब घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

टीम लोकमन by टीम लोकमन
June 26, 2025
in ताज्या घडामोडी
0
ऐकावं ते नवलचं ! आजीबाईंना टीव्ही सुरू केल्यावर दिसत होता साप, चॅनेल बदलले तरीही साप जात नव्हता ; नंतर समोर आले धक्कादायक सत्य, अजब घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

टीम लोकमन |

बाईकच्या आतमध्ये, बाथरुममध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी साप लपल्याचे आपण नेहमी ऐकले किंवा पाहिले असेल. मात्र परभणीत एक अजब घटना समोर आली आहे. येथे साप चक्क टीव्हीच्या आतमध्ये लपला होता. कोणीही कल्पना केली नसलेल्या ठिकाणी या सापाला पाहिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एलईडी टीव्हीतून चक्क एक जिवंत साप बाहेर काढण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

परभणी शहरातील गव्हाणे चौकातील मारोती दूबाकर यांच्या वृद्ध आई शेवंताबाई दूबाकर या घरामध्ये टीव्ही बघत होत्या. यावेळी टिव्हीतील हिरव्यागार झाडावर एक साप चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना दिसला. साप दिसत असल्याने त्या अवाक झाल्या. त्यांनी टीव्हीचे चॅनेल बदलले, तरीही साप टिव्हीत दिसतच होता. ही बाब त्यांनी इलेक्ट्रिशियन असलेला त्यांचा नातू राजेश आणि मुलगा मारोती दूबाकर यांना सांगितली. शेवंताबाईना चष्मा लागलेला असल्याने त्यांचा यावर विश्वास बसला नाही.

यानंतर त्यांनी टीव्ही उघडण्यास सुरुवात केली. पण यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. टीव्हीचा प्रत्येक पार्ट काढण्यासाठी तब्बल 40 मिनिटे गेली. टीव्हीतला साप बघणाऱ्याच्या काळजाचे ठोके जोराने पडत होते. टीव्हीत साप कसा जाईल असेच सगळे म्हणत होते. पण आजी शेवंताबाई मात्र टीव्हीमध्ये साप आहे आणि आपण सापच बघितला आहे यावर ठाम होत्या.

सर्पमित्र रणजित कारेगाव हे मागील 25 वर्षापासून साप पकडतात. त्यांनी हजारो साप पकडलेले आहेत. पण टीव्हीत साप असल्याचे ऐकून ते सुद्धा आवाक झाले. त्यांचाही विश्वास बसत नसल्याने त्यांनी टीव्हीवरील सापाचा व्हिडीओ करून पाठवायला सांगितले. व्हिडीओ पाहताच त्यांनी मारोती दूबाकर यांच घर गाठून सापाला रेस्क्यू केले आणि निर्जनस्थळी नेऊन सोडले व त्या सापाला जीवनदान दिले.

टीव्ही उंच भिंतीवर असताना साप तिथे गेला कसा असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तसेच टीव्हीला कुठे छिद्र नसताना साप टीव्हीत गेलाच कसा हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो आहे.

Previous Post

धक्कादायक ! भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंगाचा गंभीर आरोप ; भाजप पदाधिकाऱ्या विरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल, राजकीय क्षेत्रात खळबळ

Next Post

आमदार सुभाषबापूंनी सामाजिक वसा जपला : दत्तात्रय जमदाडे, लोकमंगल बँकेच्यावतीने मंगळवेढा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group