news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

संतभूमीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करुया : दर्शन मेहता, प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मंगळवेढ्याच्या नूतन गटशिक्षणाधिकाऱ्यांचा स्वागतपर सत्कार

टीम लोकमन by टीम लोकमन
May 7, 2025
in शैक्षणिक
0
संतभूमीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करुया : दर्शन मेहता, प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मंगळवेढ्याच्या नूतन गटशिक्षणाधिकाऱ्यांचा स्वागतपर सत्कार

टीम लोकमन मंगळवेढा |

गौरवशाली महाराष्ट्राची… मंगळवेढे भूमी संतांची… हा अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मंगळवेढा पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी दिली.

मंगळवेढा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी दर्शन मेहता यांची नुकतीच नव्याने नियुक्ती झाली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा स्वागतपर सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मंगळवेढा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना मेहता यांनी मंगळवेढा या संतभूमीमध्ये शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली आहे. प्रशासन अधिक गतिमान करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना निकोप वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी अग्रक्रम राहील असा निर्वाळा दिला.

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. तर मंगळवेढा बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळालेबद्दल बाळासाहेब आवताडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, पुरुषोत्तम राठोड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक पंडित कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकांतून तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ताटे यांनी शिक्षक समितीच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य व उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी शिक्षक नेते लक्ष्मण घुले, संभाजी सुळकुंडे, राजेंद्र कांबळे, धनंजय लेंडवे यांनी आपल्या मनोगतातून मंगळवेढा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून हाती घेण्यात येणार्या सर्व उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी शिक्षक समितीचा इतिहास, राज्य व जिल्हा स्तरावर पाठपुरावा सुरु असलेल्या प्रश्नांची माहिती दिली तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुका शाखेला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर कुचेकर यांनी केले तर आभार गजानन लिगाडे यांनी मानले. यावेळी मरवडे केंद्राचे केंद्रप्रमुख रावसाहेब सुर्यवंशी, अनिल दत्तू, शिवाजी शिलेदार, पांडुरंग शिंदे, सुर्यकांत जाधव, संतराम लाड , दत्तात्रय गवळी, हरीराम काळुंगे, दत्तात्रय सुरवसे, श्रीरंग आवळेकर, विश्वासराव आवताडे, घनश्याम शिंदे, नाथाजी कांबळे, अशोक इंगळे, किसन काळुंगे, महादेव माने, पांडुरंग कुलकर्णी, सिद्राम सावळे इत्यादी शिक्षक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात उष्णतेची दाहकता ! राष्ट्रवादीच्या आमदाराची आलिशान गाडी पेट्रोल पंपावरच पेटली, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली ; आमदार पुत्र थोडक्यात बचावले

Next Post

सेवापूर्ती गौरव सोहळा ! मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तालुक्यातील 21 सेवानिवृत्त शिक्षकांचा होणार गौरव : तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ताटे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group