माडग्याळ : नेताजी खरात
प्रसिद्ध लेखक, युवा व्याख्याते, समाज परिवर्तनकार राष्ट्रभूषण पुरस्कार विजेते प्रा.वसंत हंकारे सर यांचे “नाते लेकिचे आणि माता पित्याचे, आजची सामाजिक परिस्थिती” या विषयावर खास महिला व मुलींसाठी मंगळवार दिनांक 25 जून रोजी
माडग्याळ ता. जत येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

माडग्याळ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मंगळवार दि.25 जून रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत व्याख्यान आयोजित केले आहे . सदरचे व्याख्यान समस्त माडग्याळ ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. सध्या समाजात बाप लेकिमध्ये अनेक कारणांमुळे दुरावा निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून मुली पळून जावून वडीलांच्या इच्छे विरोधात लग्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे समाजात मुली व वडील या पवित्र नात्याला छेंद मिळत आहे. त्यामुळे समाज परिवर्तन घडवून आणणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
यासाठीच माडग्याळ येथील काही पालकांनी एकत्र येत प्रा.वसंत हंकारे यांचे समाजप्रबोधन या विषयावर व्याख्याचे आयोजन केले आहे. तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक तथा समस्त माडग्याळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.










