मंगळवेढा : अभिजीत बने
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण विश्वात भारत देशाची मान उंचावली आहे मोदींच्या नेतृत्वातच भारत देश वेगाने प्रगती करत आहे त्यामुळेच संपूर्ण शाहू परिवार नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन शाहू शिक्षण संस्थेचे सचिव अभिजीत लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.

शुक्रवारी महात्मा फुले सूतगिरणी वाघोली येथे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उपस्थितीत शाहू परिवाराचा मेळावा संपन्न झाला याप्रसंगी मार्गदर्शन करताना अभिजीत ढोबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, सरचिटणीस विकास वाघमारे, पंचायत राज विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिजीत ढोबळे म्हणाले, आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचा मोठा विकास केला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आणून सर्वसामान्य जनतेचे जीवन समृद्ध केले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठवल्यास सोलापूर जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील यामुळेच शाहू परिवारातील सर्व सदस्यांनी आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहनही अभिजीत ढोबळे यांनी केले. यावेळी शशिकांत चव्हाण विकास वाघमारे समाधान गायकवाड रवी वाघमोडे संतोष दामोदरे गणेश भोसले रामचंद्र पतंगे यांचे सह शाहू परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








