टीम लोकमन मरवडे |
मंगळवेढा तालुक्यातील डिसकळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्या 85 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. फुगारे मोटर्सचे मालक अशोक फुगारे यांच्या मातोश्री व पत्रकार समाधान फुगारे यांच्या त्या आजी होत.







