नांदेड : उज्वला गुरसुडकर
खानदेशातील भुमी पुत्र कुणाल भिमराव वारूडे यांनी प्रमुख भूमिका साकारलेला संभ्रम वेबसिरिज १० एप्रिल ला रिलिज होणार आहे. अशी माहिती अभिनेता तथा मेकअप आर्टिस्ट कुणाल वारूडे यांनी धुळे जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुखद आणि दुःखदायक घटना घडत असतात, पण काही वेळा त्याच घटना आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जातात. जवळपास एक वेगळा च भ्रम निर्माण होतो. अचानक चित्तथरारक रूप येते. मग काय आयुष्यात अनपेक्षित बदल निर्माण होतात.या सर्व गोष्टी इथेच थांबत नाहीत, तर सर्वांचा परिणाम आपल्या आयुष्यातील महत्वाच्या नात्यावर देखील होतो. मगं काय आयुष्यात उरतो तो फक्त आणि फक्त “संभ्रम” म्हणून वाय प्रॉडक्शन्स निर्मित संभ्रम 10 एप्रिल 2024 रोजी मैक्स प्लेअर ओटीटी प्लेटफॉम वर रिलीज होणारं आहे. निर्माण आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकड दिग्दर्शक सागर गोसावी यांनी काम पहिले आहे. या कथेत कोकणातील एका सर्वसामान्य तरुणांच्या आयुष्यातील अचानक घडणाऱ्या रहस्यमय आणि असामान्य गोष्टी मुळे प्रेम मैत्री नातें या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो. त्यामुळे जवळची नाही दुरावली जातात संभ्रम एक रहस्यमय कथा असून प्रेक्षकांच्या मनात भ्रम निर्माण करणारी कथा आहे. मात्र सुंदर असे एक प्रेमगीत’ आहे. खान्देश वासियांसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे ‘राम’ वेबसीरीज मध्ये खान्देश पुत्र कुणाल भिमराव वारुडे अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘कुणाल यांचे मुळगाव खान्देशातील मुडावद असून ते धुळ्याचे रहिवाशी आहेत. कुणाल यांचं शिक्षण धुळ्यातील जयहिंद संस्थेत झालेलं आहे. त्यांना अगदी लहानपणापासून अभिनयाची आवड होती त्यांनी शाळेत महाविद्यालयात असताना नाटकात भूमिका सादर केल्या, तसेच काही पथनाट्य देखील सादर केले. त्यांच्या उत्तम अभिनयासाठी त्यांची 2022 या वर्षी एस आर वाय प्रॉडक्शन्स हाऊस या माध्यमाने संभ्रम निर्मिती साठी निवड केली. या वेबसीरीज च चित्रीकरण कोकणातील सावंतवाडी गावात पूर्व झाले आहे. कुणाल यांनी कल्पेश या पात्राची भूमिका केलेली आहे. यांनी भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांनी कल्पेश या भुमीकेला पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी आपल्या धुळ्याच्या कलाकारांचा अभिमान बाळगावा अस काम कुणाल यांनी “संभ्रम” मध्ये केलेले आहे….