टीम लोकमन मंगळवेढा |
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित जिजामाता प्राथमिक शाळा शिशुविहार मंगळवेढा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक प्रविण खवतोडे, शाळेचे मुख्याध्यापक प्रविण गुंड, समाजसेवक जनार्दन अवघडे, प्रकाश खंदारे, प्रविण अवघडे यांच्या उपस्थितीत फोटोपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली. भाषण करणाऱ्या सर्व 25 विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
तसेच शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थी अर्जुन कांबळे याने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत उत्तुंग असे यश संपादन केल्याबद्दल त्याचा सत्कार करून भेटवस्तु देण्यात आली.भाषणानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक प्रविण खवतोडे, मुख्याध्यापक प्रविण गुंड, समाजसेवक प्रकाश खंदारे, जनार्दन अवघडे, प्रविण अवघडे, पेंटर सुभाष भंडारे, विक्रम अवघडे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व पालक उपस्थित होते.











