टीम लोकमन मंगळवेढा |
कै.रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशिय संस्था, सिध्दापूर संचलित आर.बी.सी. इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तांडोर-सिध्दापूर ता. मंगळवेढा, जि. सोलापुर आयोजित सिध्दापूर फेस्टीव्हल-2025 चा पत्रकारिता क्षेत्रातील जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार प्रमोद बिनवडे यांना जाहीर झाला असल्याचे फेस्टिवलचे गजानन पाटील सर यांनी सांगितले.

हा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सिध्दापूर येथे होणार असून पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पत्रकार प्रमोद बिनवडे यांनी नेहमीच उपेक्षित व अन्यायग्रस्त वर्गासाठी आपली पत्रकारिता केली असून या सर्व गोष्टीची दखल म्हणून व पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून चांगले कार्य करत असताना त्यांना नवी दिल्ली येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोसिप पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार, मंगळवेढा येथून चालणाऱ्या दामाजी न्युज चॅनलचा व साप्ताहिक मंगळवेढा दणकाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले असुन आता सिद्धापूर फेस्टिवलचा आदर्श पत्रकार पुरस्कारही प्रमोद बिनवडे यांना जाहीर करण्यात आला आहे.










