टीम लोकमत मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या पडोळकरवाडी येथील तलाव म्हैसाळ योजनेचे पाणी व झालेल्या पावसाच्या पाण्याने दोन वर्षानंतर भरून ओव्हर फ्लो झाल्यानंतर येथील ग्रामस्थांनी आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत या तलावातील पाण्याचे जलपूजन केले. यावेळी भीमा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धोत्रे, म्हैसाळचे शाखा अभियंता शिंदे, माजी सरपंच मरगु कोळेकर, विद्यमान सरपंच शिवाजी पडळकर, उपसभापती सुरेश ढोणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, ब्रह्मदेव रेवे, दत्तात्रय मळगे, मच्छिंद्र खताळ यांचेसह आसपासच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले की, या जलपूजन केलेल्या तलावामध्ये आणखी जास्त पाणी बसण्याच्या उद्देशाने या सांडव्याची उंची वाढवून घेण्यासंदर्भात सर्वे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत मंगळवेढा तालुक्यातील सर्व साठवण तलाव ज्या त्या योजनेअंतर्गत पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याने भरून घेण्यात येणार आहेत तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून त्या त्या गावातील ग्रामस्थांनी पाठपुरावा करून तलाव भरून घेण्यात यावेत.
पावसाळ्यामध्ये जेवढे पाणी शेतामध्ये जिरवले जाईल तेवढा आपणाला उन्हाळ्यात फायदा होणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पावसाचे पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरवले पाहिजे जमिनीतील पाणी पातळी वाढली तरच दुष्काळाची दाहकता जाणवणार नाही. म्हैसाळचे पाणी सर्व साठवन तलावामध्ये सोडून ते भरण्यात यावेत असे आदेश आमदार आवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून तो तलाव ही तात्काळ भरून घेण्यात येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यावेळी भारत गरंडे, लक्ष्मण नरोटे, दत्ता साबणे, सचिन नागणे, बाळासाहेब काकडे, अशोक वाघमोडे, शहाजी गायकवाड, यशवंत खताळ, सुनील कांबळे, गुरु बिराजदार, व्यंकट पाटील, नामदेव गोरड, रावसाहेब कोळेकर, काका मिसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.