news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

ऐकावं ते नवलचं ! सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात तब्बल सहा वेळा दंश ; भीतीने पळून मावशीच्या घरी गेला तरी तिथेही पोहोचून केला दंश, घटनेने सर्वत्र खळबळ, अखेर….

टीम लोकमन by टीम लोकमन
July 9, 2024
in ताज्या घडामोडी
0
ऐकावं ते नवलचं ! सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात तब्बल सहा वेळा दंश ; भीतीने पळून मावशीच्या घरी गेला तरी तिथेही पोहोचून केला दंश, घटनेने सर्वत्र खळबळ, अखेर….

टीम लोकमन मंगळवेढा |

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एका तरुणाला सहावेळा सर्पदंश झाला आहे. फक्त दीड महिन्यात सापाने तब्बल सहावेळा एकाच तरुणाला दंश केला आहे. तरुणाच्या सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. आश्चर्य म्हणजे सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी तरुण पळून आपल्या मावशीच्या घरी गेला होता. यानंतर त्याने काकाचेही घर गाठले होते. पण तरीही सापाने त्याचा पाठलाग काही सोडलाच नाही. सापाने वारंवार त्याच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे तरुणाच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून, एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे त्या तरुणावर उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.

मलवा पोलीस ठाणे क्षेत्राच्या सारा गावात हा प्रकार घडला आहे. येथे राहणाऱ्या विकास दुबे नावाच्या तरुणाला दीड महिन्यात सापाने एक-दोन नव्हे तर तब्बल 6 वेळा दंश केला आहे. पण त्याच्या सुदैवाने दरवेळी उपचारानंतर तो बरा झाला आहे. सध्याही त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कारण गेल्या दोन दिवसांत सापाने सहाव्यांदा त्याला दंश केला आहे.

विकासने सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःचे घर सोडले आहे. आधी तो आपल्या मावशीच्या घरी पोहोचला होता. पण तिथेही साप पोहोचला आणि त्याला दंश केला. यानंतर तो आपल्या काकांच्या घरी गेला असता सापाने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि दंश केला. आता विकास आणि त्याच्या कुटुंबीयांना आपण नेमके काय करावे हेच समजत नाही. त्यामुळे हे कुटुंब प्रचंड तणावाखाली आणि भीतीच्या छायेत आहे.

पीडित विकास दुबेने सांगितलं आहे की, गेल्या दीड महिन्यात 6 वेळा सापाने त्याला दंश केला असून दरवेळी तो वाचला आहे. साप दंश करण्याआधी आपल्याला साप हल्ला करणार असल्याचा भास होतो असे त्याचे म्हणणे आहे. या घटनेमुळे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.

विकासने सांगितलं की, 2 जूनच्या रात्री 9 वाजता बेडवरुन खाली उतरताना सर्वात आधी सापाने दंश केला. यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळच्या नर्सिंग होममध्ये दाखल केले. उपचारानंतर तो घरी परतला असता 8 दिवसांनी म्हणजेच 10 जूनच्या रात्री दुसऱ्यांदा सापाने त्याला दंश केला. यानंतर पुन्हा एकदा उपचार झाल्यावर तो घऱी परतला. पण यामुळे तो थोडा घाबरला होता. पण हे प्रकरण इथेच थांबणारे नव्हते.

यानंतर पुढील 20 दिवसांत दोन वेळा सापाने त्याला दंश केला. प्रत्येकवेळी उपचारानंतर तो बरा झाला. या घटनेमुळे त्याचे नातेवाईक आणि डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. काहींनी त्याला काही दिवस घरापासून दूर जाण्याचा सल्लाही दिला.

घाबरलेल्या विकास रायने सर्वांचा सल्ला ऐकला आणि आपल्या मावशीच्या घरी गेला. पण मावशीच्या घरीही साप पोहोचला. 28 जूनला सापाने मावशीच्या घरी विकासला पाचव्यांदा दंश केला. त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला. यानंतर तो काकाच्या घरी राहण्यासाठी गेला. पण तिथेही सापाने पाठलाग करत सहाव्यांदा दंश केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चांगली नसल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय प्रचंड तणावाखाली असून भीतीच्या छायेत वावरत आहे.

Previous Post

मंगळवेढ्यात श्रीमंत मेन्सवेअर कापड दालनाचे थाटात उदघाटन ; आमदार समाधान आवताडे, लक्ष्मणराव ढोबळे, शिवाजीराव काळुंगे, बिराप्पा जाधव यांची उपस्थिती

Next Post

राज्यातील 15 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; राज्याच्या गृहमंत्रालयाने सोमवारी बदल्यांचे आदेश केले जारी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group