टीम लोकमन मंगळवेढा |
नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ मंगळवेढा संचलित नगरपालिका कन्या शाळा क्रमांक 1 मंगळवेढा येथे सर्व महिला पालकांसाठी जागर नारी शक्तीचा म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहशिक्षिका आशा वाले होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक मारुती दवले यांनी केले. संजय चेळेकर यांनी सर्व महिला पालकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शाळेच्या महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या. शाळेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये चेहऱ्यावर एका मिनिटात टिकल्या लावणे व संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या. चेहऱ्यावर टिकली लावणे या स्पर्धेमध्ये सौ. प्रियांका सातपुते यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सौ. मिनाक्षी अतुल सावंजी व तृतीय क्रमांक सौ. प्रतिमा दादासाहेब लेंडवे यांनी पटकावला. या स्पर्धेमुळे सर्व महिलांचे मनोरंजन तर झालेच पण या स्पर्धेमुळे महिलांना आनंद मिळाला.
दुसरी स्पर्धा संगीत खुर्ची होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.सारिका मारुती दवले, द्वितीय क्रमांक सौ. प्रतीक्षा प्रमोदकुमार ठोंबरे, तृतीय क्रमांक सौ. सोनाली आनंद वडतिले यांनी पटकावला. ही स्पर्धा खूपच अटीतटीची झाली. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळावणाऱ्या महिलांसाठी शाळेमार्फत आकर्षक बक्षीसे देण्यात आली.
या खेळांमुळे महिलांसाठी एक दिवस खूप छान आनंद मिळाल्याची भावना सर्व महिलांनी व्यक्त केली. सर्व पालक वर्गातून या कार्यक्रमामुळे समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती आशा वाले, मुख्याध्यापक अरविंद क्षीरसागर, सहशिक्षक संजय चेळेकर, मारुती दवले यांनी परिश्रम घेतले.