news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय ; आमदार समाधान आवताडे यांनी अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना दिला इशारा

टीम लोकमन by टीम लोकमन
March 11, 2025
in ताज्या घडामोडी
0
म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय ; आमदार समाधान आवताडे यांनी अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना दिला इशारा

टीम लोकमन मंगळवेढा |

म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणात दुजाभाव केला जात आहे. मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून वितरिका क्रमांक 1 मधून काही गावांना वितरिका क्रमांक 2 मधील बहुतांश गावांना आणि उमदी डीवाय मधील सर्व गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. उमदी डीवायमधील गावांना तर गेल्या दोन वर्षांपासून पाणी मिळालेले नाही. ही मंगळवेढा तालुक्यातील परिस्थिती असताना शेजारील जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. हा दुजाभाव का? मंगळवेढा तालुक्यावर नेहमीच दुजाभाव होत असून हे अन्यायकारक आहे.

मंगळवेढा ‘टेल’ला असल्याने हा अन्याय सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पाणी वितरणाचे नियोजन करावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरण बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिला. महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ अंतर्गत म्हैसाळ योजनेच्या वितरणाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

मंगळवेढ्यासाठी 1.27 टीएमसी पाणी मंजूर असताना त्यातील केवळ 37 टक्के पाणी दिले जाते. इतकं कमी पाणी का? असा प्रश्न उपस्थित करून मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पावरील लाभक्षेत्रातील गावात पाण्याची परिस्थिती बिकट होत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची आवश्यकता आहे. एकीकडे म्हैसाळ योजनेत गावे असल्याने प्रशासन टँकर देत नाही. आणि दुसरीकडे म्हैसाळ योजनेतूनही पाणी येत नाही. त्यामुळे या गावातील लोकांनी करायचं तरी काय? हा प्रश्न आमदार अवताडे यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित करत अधिकाऱ्यांची बोलती बंद केली.

यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या परिस्थितीबाबत थेट अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडून पत्र व्यवहार करूनही अधिकारी प्रतिसाद देत नाही ही बाबही आमदार आवताडे यांनी मंत्र्यांसमोर निदर्शनास आणली. तसेच मंगळवेढा तालुक्याबाबत असलेली अधिकाऱ्यांची मानसिकताही या बैठकीत निदर्शनास आणली. त्यावर या मानसिकतेत बदल करण्याच्या स्पष्ट सूचना आणि ताकीद राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. शिवाय स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन पाणी देण्याची व्यवस्था करावी असे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवाय यापुढे पाणी वितरणाबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.

या बैठकीला क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार महेश लांडगे, आमदार अमल महाडिक, आमदार शंकर जगताप आदी लोकप्रतिनिधी तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल अकोले, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

Previous Post

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथील विदयुत अभियांत्रिकी विभागाची सानपाडा ट्रॅक्शन सिस्टिम नवी मुंबई व एन्कॉन पुणे या कंपनीस औद्योगिक भेट

Next Post

रौप्यमहोत्सवी वर्ष 2025 ! कलावंतांची शोभायात्रा ठरणार मरवडे फेस्टिव्हलचे आकर्षण ; 17 मार्च रोजी राज्यातील शेकडो पारंपारिक कलावंत होणार शोभायात्रेत सहभागी : सुरेश पवार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group