टीम लोकमन मिरज |
सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील इंदुमती जगन्नाथ जाधव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 82 वर्षांच्या होत्या. सांगली येथील वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी पांडुरंग जगन्नाथ जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्चात चार विवाहित मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
इंदुमती जाधव यांचेवर सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोने ग्रामस्थांसह, शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









