टीम लोकमन माडग्याळ |
मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या पतसंस्थेच्या माडग्याळ तालुका जत येथील नवीन शाखेचा शुभारंभ जतचे सहाय्यक निबंधक अमोलजी डफळे सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड म्हणाले की, मनमंदिर बँक व पतसंस्था सुरू करून 32 वर्षे झाली असून आमच्या शाखेतर्फे ठेवीदारांना तत्पर व विनम्र सेवा दिली जाते, ठेवीवर आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज योजना असून यामध्ये पिग्मी बेसवरती त्वरित कर्ज वाटप, घर तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, ठेव तारण कर्ज ,सोने तारण कर्ज इत्यादी कर्जाची सोय उपलब्ध आहे.
आरटीजीएस व एनएफटी ची सेवा उपलब्ध आहे. कोअर बँकिंग द्वारे ग्राहकांना सेवा देणारी पतसंस्था असून या शाखेमध्ये ग्राहकांसाठी लॉकरची सुविधा देखील उपलब्ध आहे. मनमंदिर पतसंस्थेचे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ कायम असून संपूर्ण संगणक प्रणालीद्वारे सेवा दिली जाते.
यावेळी चेअरमन अजित गायकवाड, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर यादव, संचालक शशिकांत तारळेकर, भूपेंद्र बारसिंग, शाखाधिकारी मल्लिकार्जुन जावळकोटी, व्यवस्थापक डी. एम. पवार, डॉ प्रदीप शिंदे, डॉ. भीमाण्णा माळी, डॉ. सार्थक हिट्टी, सरपंच सौ अनिता माळी, उपसरपंच बाळासाहेब सावंत, सोमण्णा हाक्के, विठ्ठल निकम, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, शिवानंद हाक्के, एकनाथ बंडगर, बँक प्रतिनिधी आंबाना माळी व पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच गावातील नागरिक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट यांचे सहकार्य लाभले.








