माडग्याळ : नेताजी खरात
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र गुड्डापूर येथे विस्तीर्ण अशा दोन एकर जागेत नऊ कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या कर्नाटक भवनचे उद्घाटन गुरुवार दिनांक 1ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मुजराई आणि वाहतूक मंत्री रामलिंग रेड्डी व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचेहस्ते व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विजूगौडा पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागात श्री दानम्मा देवीच्या दर्शनाला येणारे बहुसंख्य भाविक हे कर्नाटकातील आहेत. पंधरा वर्षांपूर्वी ट्रस्टच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कर्नाटक सरकारच्या वतीने कर्नाटक भवन बांधण्याची विनंती केली होती. त्यानुसार संबंधित बांधकामासाठी कर्नाटक शासनाकडून जागेची मागणी केल्यानंतर देवस्थान कडून दोन एकर जमीन कर्नाटक शासनाच्या नावे खरेदी करून दिली होती. त्या अनुषंगाने कर्नाटक सरकारने मोफत कर्नाटक भवन बांधकाम साठी समिती दिली होती. तसेच श्री क्षेत्र गुड्डापूर येथे कर्नाटक भवन बांधण्यासाठी सुमारे अकरा कोटी रुपयाचे अनुदान ही मंजूर करण्यात आले होते. यामध्ये नऊ कोटी रुपये निधी बांधकामासाठी खर्च करून भव्य असे कर्नाटक भवन बांधण्यात आले आहे.
नव्याने बांधलेल्या या कर्नाटक भवनचा उद्घाटन सोहळ्यासाठी निधी मंजूर केलेल्या कर्नाटकच्या मजुराई विभागाच्या माजी मंत्री शशिकला अण्णासाहेब जोल्ले, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील, एम बी पाटील, लक्ष्मी हेब्बालकर, सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, विजयपूरचे खासदार रमेश जिगजिनगी, चित्रदुर्गचे खासदार गोविंद कारजोळ, बागलकोटचे खासदार पी. सी. गद्दीगौडर, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, आमदार गोपीचंद पडळकर, विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, दावणगेरीचे आमदार शामनूर शिवशंकरप्पा, धारवाडचे आमदार विनय कुलकर्णी.
सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, सिंदगीचे आमदार अशोक मनगुळी, इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील, मुदधेबिहाळचे आमदार आप्पाजी नाडगौड, देवरहिप्परगीचे आमदार राजूगौडा पाटील, तेरदाळचे आमदार सिध्दू सवदी, नागठाणचे आमदार विठ्ठल कटकदोंड, देवरहिप्परगीचे माजी आमदार सोमनगौडा बी पाटील, विजयपूर भाजप जिल्हाध्यक्ष आर एस पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमन्नगौडा रवीपाटील, गुड्डापूर सरपंच तुळसाबाई थोरात, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, विजयपूर जिल्हाधिकारी टी. भूभालन, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, विजयपूर पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी श्री दानम्मादेवी देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष विजुगोंडा पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी खजिनदार चंद्रशेखर इंडी विश्वस्त सिद्धराय हिरेमठ, प्रकाश गणी, सदाशिव गुड्डोडगी, शंभूलिंग ममदापूर, गजेंद्र कुल्लोळी, सागर चंपण्णावर, धानाप्पा पुजारी, मल्लिकार्जुन पुजारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.
या उद्घाटनासाठी स्वामी, सामाजिक, राजकीय नेते, अधिकारी, गावकरी, पुजारी उपस्थित राहणार आहेत. तसेच भाविकांनी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी केले आहे.







