बोराळे : राजकुमार धनवे
बोराळे ता. मंगळवेढा येथील महादेवी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व परमपूज्य मनोहर माधव कवचाळे सर प्रतिष्ठान या संस्थेच्या नूतन वास्तूचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात पतसंस्थेच्या परिसरात बांधलेल्या महादेव मंदिरामध्ये वेदमूर्ती महांतेश हिरेमठ यांच्या शुभहस्ते महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा करून झाली. प्रमुख पाहुणे नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे अध्यक्ष आण्णाराव कुंभार, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा शाईन शेख मॅडम, मसाप दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पतसंस्थेच्या व प्रतिष्ठानच्या नूतन इमारतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कै. मनोहर माधव कवचाळे व कै.महादेवी मनोहर कवचाळे यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत पतसंस्थेच्या चेअरमन जयश्री कवचाळे यांनी पतसंस्थेचा तीन वर्षाचा चढता आलेख आपल्या अस्खलित वाणीतून सादर केला. पतसंस्था ही फक्त अर्थकारण करण्यासाठी नसून गरजू लोकांना अर्थसाह्य करून सक्षम करण्यासाठी पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली असून, पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवींच्या सुरक्षेची जबाबदारी ही तेवढ्याच प्रमाणात महत्त्वाची आहे. पतसंस्थेचा प्रत्येक सभासद, ठेवीदार, कर्जदार हे आमचे दैवत असून, याही पुढे प्रत्येकाच्या आर्थिक प्रगतीसाठी पतसंस्था सदैव प्रयत्नशील राहील असे अभिवचनही त्यांनी दिले. पतसंस्थेच्या अर्थकारणाबरोबर सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यामध्ये ही पतसंस्थेचा खूप मोठा वाटा असून या पुढेही असेच समाजकार्य करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले की, कै. मनोहर कवचाळे हे शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व होते. आज त्यांचे चिरंजीव संजीव कवचाळे व स्नुशा जयश्री कवचाळे हे त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेत समाजकार्य म्हणून पतसंस्थेचेही कार्य उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. त्यांच्या सत्कार्यास शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके म्हणाले की, ज्या पतसंस्थेचा शुभारंभ माझ्या व माझ्या पत्नी प्रणिताताई भालके यांच्याहस्ते झाला होता, त्याच पतसंस्थेची तीन वर्षातच एवढी भव्य इमारत उभी राहून त्या इमारतीच्या उद्घाटनाला मला उपस्थित राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो. नेहमीच कवचाळे व भालके कुटुंबियांचे ऋणानुबंध राहिलेले आहेत. यापुढेही पतसंस्थेची व प्रतिष्ठानची अशीच भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे अध्यक्ष आण्णाराव कुंभार यांनीही पतसंस्थेच्या कार्याचा उलघडा करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार म्हणाले, कवचाळे दांपत्य हे आदर्श दाम्पत्य असून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करत आहेत. यापुढेही त्यांचे कार्य असेच अविरतपणे चालू राहो अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्याची माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महादेवी पतसंस्थेचे व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या वतीने चेअरमन जयश्री कवचाळे यांना अर्धा तोळे सोने भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच बोराळे व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, महिलांनी संजीव कवचाळे व जयश्री कवचाळे या दाम्पत्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांची पतसंस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कार्यक्रमांस दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे संस्थेचे अध्यक्ष भीमराव पाटील, दामाजी कारखान्याचे संचालक दयानंद सोनगे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा शाहिन शेख, सुवर्णरत्न बँकेचे संस्थापक महादेव बिराजदार, धनलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष भीमाशंकर पुजारी, सरपंच सुजाता पाटील, माजी उपसभापती रमेश भांजे, शिवशंकर भांजे, गंगाधर काकणकी, सचिन नकाते, ऑडीटर मधुकर भंडगे, विठ्ठल बिराजदार, माध्यमिक पतसंस्थेचे संचालक राजेंद्र माळी, दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन पंडीत पाटील, बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष बसवराज बगले, दामाजी कारखान्याचे संचालक दयानंद सोनगे, दिलीपकुमार धनवे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक भीमाशंकर पुजारी, सचिन चौगुले, विनोद पाटील, शिवशंकर भांजे, विश्वनाथ पाटील, शिवशंकर कवचाळे, शिवाप्पा कवचाळे, भारत पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, संभाजी सलगर, जयंत पवार, संत दामाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याते प्रा. डॉ. राजकुमार पवार, मंगळवेढा तालुका माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन राजकुमार धनवे, मंगळवेढा पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अंकुश भोजने, नूतन हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र वाघमारे, पर्यवेक्षक सिद्धाराम सोनगे, मुख्याध्यापक नानासाहेब कपले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कवचाळे परिवार, पतसंस्थेचे सर्व संचालक, सभासद, व्यवस्थापक मल्लिकार्जून चौगुले व कर्मचारी तसेच बोराळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सर्व संचालक पतसंस्थेचे सर्व संचालक सर्व कर्मचारी व कवचाळे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक भारत मुढे यांनी केले, तर आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव कवचाळे यांनी मानले.











