टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होत असलेल्या निदान हायटेक सिटीस्कॅन सेंटरचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी होणार असल्याची माहिती निदान हायटेक सिटीस्कॅन सेंटरचे संचालक व सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय घोडके व बालरोग तज्ञ डॉ. आसावरी दत्तात्रय घोडके यांनी दिली.
शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर निदान हायटेक सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे शुभहस्ते व मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व मंगळवेढा नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप, कृषिराज परिवाराचे संस्थापक युवराज शिंदे, मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण खवतोडे, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. मधुकर कुंभारे, निमाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष डॉ. सुभाष देशमुख, होमिओपॅथी संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष डॉ. शाकीर सय्यद यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
डॉ. दत्तात्रय घोडके हे मंगळवेढा व परिसरातील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट असून गेल्या अनेक वर्षांपासून ते मंगळवेढा शहरात निदान सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवेत कार्यरत आहेत. सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे सोबतच सिटीस्कॅन सेवा देण्यासाठी आता डॉ. दत्तात्रय घोडके सज्ज असून त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, पंढरपूर-विजयपूर रोड, मंगळवेढा येथे अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आली असून यामुळे मंगळवेढा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सुविधांमध्ये भर पडली आहे.
शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, पंढरपूर-विजयपूर रोड मंगळवेढा येथे होणाऱ्या निदान हायटेक सिटीस्कॅन सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास मंगळवेढा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निदान हायटेक सिटीस्कॅन सेंटरचे संचालक डॉ. दत्तात्रय घोडके व डॉ. आसावरी घोडके यांनी केले आहे.