news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

वकिली क्षेत्रात ॲड. श्रीराम चौधरी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक प्राप्त करावा : उद्योजक संजय आवताडे

टीम लोकमन by टीम लोकमन
June 20, 2024
in सामाजिक
0
वकिली क्षेत्रात ॲड. श्रीराम चौधरी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक प्राप्त करावा : उद्योजक संजय आवताडे

टीम लोकमन मंगळवेढा |

वकिली क्षेत्रात ॲड.श्रीराम शांताराम चौधरी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक प्राप्त करावा. मोठे यश मिळवत उत्तुंग भरारी घ्यावी असे मत मंगळवेढा येथील नामांकित उद्योजक व आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केले.

ॲड. श्रीराम चौधरी यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (फौजदारी विभाग) पदी निवड झाल्याबद्दल हजारे व कलुबर्मे परिवाराच्या वतीने रायगड निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आवताडे पुढे म्हणाले, ॲड.चौधरी यांनी आपल्या वडिलांकडून व मामा ज्येष्ठविधीज्ञ ॲड.धनंजय हजारे यांच्याकडून बाळकडू घेतले आहेत. आपला व्यवसाय जरी दुधारी असला तरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा तसेच विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांच्यासारखे नाव कमवून आपले आजोळ असणाऱ्या मंगळवेढ्याचा नावलौकिक वाढवावा. अशा सदिच्छा यावेळी अवताडे यांनी व्यक्त केल्या.

ॲड. श्रीराम चौधरी यांचा सत्कार आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, माजी नगराध्यक्ष युवराज कलुबर्मे, उद्योजक जयदीप रत्नपारखी, अजित जगताप यांचेसह प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मंगळवेढा वकील संघाकडून अध्यक्ष ॲड. उल्हास माने, व्यापारी कमिटीच्या वतीने जयदीप रत्नपारखी, वारी परिवाराकडून अजित जगताप, सकल मराठा समाजाकडून विलास आवताडे, सुनील डोके, गणेश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तर ॲड श्रीराम चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अनेक अनभुव सांगून मंगळवेढ्यातील लोंकानी दिलेले प्रेम आयुष्यभर स्मरणात राहील असे सांगून सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी प्रभाकर घुले, विठ्ठल गायकवाड, डी. एन.जाधव, सुनील पाटील, शरद हेंबाडे, अंकुश पडवळे, नितीन सुरवसे, सतिश हजारे, कुमार धनवे, भारत नागणे, सिद्धेश्वर दत्तू, प्रा. धनाजी गवळी, ॲड. सुजय लवटे, ॲड. मनीष मर्दा, ॲड. प्रदीप पवार, ॲड.डी.एस.माने, ॲड.शिरीष पवार, ॲड.सीमा ढावरे, ॲड.राणी चौधरी, मुझ्झमील काझी, ज्ञानेश्वर कलुबर्मे, दयानंद पाटील, सतिश दत्तू, अरुण गुंगे, विजय हजारे, प्रा.विक्रम पवार, विठ्ठल बिले, प्रफुल्ल सोमदळे, रवी जाधव, प्रा.विजय दत्तू, आप्पासाहेब हजारे, वैभव हजारे, युवराज हजारे, सम्राट हजारे, ओम कलुबर्मे यांच्यासह वारी परिवार, वकील संघ, रविवार परिवार, सकल मराठा समाज, हजारे, कलुबर्मे, चौधरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुवर्मे यांनी केले तर ॲड. धनंजय हजारे यांनी आभार मानले

Previous Post

वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (एटीएस) म्हणून नियुक्ती

Next Post

पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी असा असावा पावसाळी आहार ; आयुर्वेद तज्ञ डॉ. नयना व्यवहारे

Next Post
पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी असा असावा पावसाळी आहार ; आयुर्वेद तज्ञ डॉ. नयना व्यवहारे

पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी असा असावा पावसाळी आहार ; आयुर्वेद तज्ञ डॉ. नयना व्यवहारे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group