news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालदिंडी व रिंगण सोहळा चैतन्यमय वातावरणात संपन्न ; बालचमुंच्या अलौकिक रुपात साक्षात अवतरली पंढरी

टीम लोकमन by टीम लोकमन
July 16, 2024
in शैक्षणिक
0
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालदिंडी व रिंगण सोहळा चैतन्यमय वातावरणात संपन्न ; बालचमुंच्या अलौकिक रुपात साक्षात अवतरली पंढरी

xr:d:DAFmhgELku8:27,j:5238080574528359582,t:23062207

टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात श्री संत दामाजी पंतांच्या पालखी आगमनाने झाली.

त्यानंतर प्राचार्य सुधीर पवार यांचेहस्ते श्री. विठ्ठल आणि श्री.रुक्मिणीमाता यांच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यात आली. यावेळी बालचमूनी साकार केलेल्या या बालदिंडी आणि रिंगण सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई या सर्व संतांची मांदियाळीच जणू शाळेत अवतरलेली सर्वांना पाहायला मिळाली. कमरेवरती हात ठेवून विठुरायाचे ते सावळे, सुंदर, मनोहर आणि साजिरे स्वरूप त्याचबरोबर रुक्मिणी मातेचे ते अलौकिक रूप पाहून साक्षात पंढरीच शाळेत अवतरल्याचा भास सर्वांना होत होता.

प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका हातात घेऊन, डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठू नामाच्या गजराने रिंगण सोहळ्यातील नुत्याविष्काराने सर्व परिसर दुमदुमून सोडला. मानवी रुपात साकारलेले विठ्ठल-रूखमाई आणि सोबतच सर्व संतांचे दर्शन,रिंगण,फुगडी,पावली,अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पारंपरिक खेळांनी आणि अभंग व भक्तीगीत आणि समूह नृत्याने बालचुमुंनी सर्वांची मने वेधून घेतली.

ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून बालमनावर केले जाणारे संस्कार भारताचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्राचार्य सुधीर पवार यांनी सांगितले. तसेच वारी परंपरा ही ८०० वर्षांपासून सुरू असून साधारणपणे १६८५ मध्ये याची सुरुवात झाली आणि सर्व संतांची शिकवण आपण आपल्या आचरणात आणली पाहिजे असेही त्यांनी सांगितले आणि विदयार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले.

सदर बालदिंडीचे आणि रिंगण सोहळ्याचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक मंगेश केकडे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

डॉक्टरांनाही लागले विधानसभेचे वेध ! भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास जत विधानसभा मोठ्या ताकदीने लढविणार आणि जिंकणारही : डॉ. सार्थक हिट्टी

Next Post

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक पंढरपुरात ; 11 हेक्टर जागेवर उभारलेल्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार लोकार्पण 

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group