news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा सांगोला रोडवरील हॉटेल आयपीएल ग्रँड फॅमिली रेस्टॉरंटचा आज शुभारंभ ; मंगळवेढ्यातील तीन युवा उद्योजकांची हॉटेल व्यवसायात एन्ट्री

टीम लोकमन by टीम लोकमन
May 18, 2024
in ताज्या घडामोडी
0
मंगळवेढा सांगोला रोडवरील हॉटेल आयपीएल ग्रँड फॅमिली रेस्टॉरंटचा आज शुभारंभ ; मंगळवेढ्यातील तीन युवा उद्योजकांची हॉटेल व्यवसायात एन्ट्री

टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढ्यातील तीन युवा उद्योजकांनी एकत्र येऊन मंगळवेढा सांगोला रोडवरील काळा खडक येथे सुरू केलेल्या हॉटेल आयपीएल ग्रँड फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी सुनिता बलभीम इंगळे, सुमन भगवान लिगाडे, रंजना महेश पवार यांचे अमृतहस्ते होणार असल्याची माहिती हॉटेलचे संचालक उदयसिंह इंगळे यांनी दिली.

शाकाहारी व मांसाहारी साठी स्वतंत्र किचन आणि ग्राहकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असलेले हे मंगळवेढ्यातील पहिलेच रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट मध्ये गार्डन, डायनिंग व पार्टी हॉलची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन, वेस्टर्न, साउथ इंडियन नाष्टा, चायनीज, सी-फुड, स्पेशल शिक कढाई, पंजाबी डिशेष,  कॉन्टिनेन्टल, मेक्सिकन, पिझ्झा, बर्गर, मॉकटेल्स, आईस्क्रीम यांचेसह विविध नवनवीन व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची रेलचेल असणार आहे. २०१९ चा वर्क इन इंडिया हॉस्पिटॅलिटी आयकॉन पुरस्कार विजेते मास्टर शेफ पातुर हे या रेस्टॉरंटमध्ये सेवा देणार आहेत. या रेस्टॉरंटचे नाव आयपीएल असून त्याची कहाणीही तितकीच रंजक आहे. या हॉटेलचे तीन पार्टनर असून इंगळे, पवार आणि लिगाडे या तिघांच्याही आडनावातील पहिले एक अक्षर घेऊन इंगळे-I, पवार-P, लिगाडे-L घेऊन आयपीएल हे नाव रेस्टॉरंटला देण्यात आले आहे.

आज सायंकाळी हॉटेलच्या होणाऱ्या या उद्घाटन समारंभासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोलाचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे, जिजामाता परिवाराचे संस्थापक रामकृष्ण नागणे, जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, उद्योजक महादेव नागणे, मुढवीचे माजी सरपंच कल्याण रोकडे, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. सुजित बापू कदम, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव, करवीर जि. कोल्हापूर येथील तहसीलदार स्वप्नील रावडे, इंदौरचे उद्योजक सोनू शिंदे, वाटंबरे येथील उद्योजक आप्पासो गव्हाणे, पाचेगाव येथील उद्योजक नानासो मिसाळ, प्रगतिशील बागायतदार अशोक भोसले, उद्योजक अरविंद सावंत, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी डॉ. माणिक पवार, सिद्धेश्वर भोसले सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मंगळवेढा सांगोला रोडवर मंगळवेढा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील काळा खडक येथे साकारलेल्या हॉटेल आयपीएल ग्रँड फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभासाठी मंगळवेढा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रेस्टॉरंटचे संचालक उदयसिंह इंगळे, महेश पवार, प्रभाकर लिगाडे यांनी केले आहे.

Previous Post

संख येथील साहेबगौडा बिराजदार यांचे घर आगीत भस्मसात ; कुटुंब उघड्यावर, लाखोंचे नुकसान

Next Post

रतनचंद शहा सहकारी बँकेला दिलेला धनादेश अनादर झाल्याप्रकरणी आरोपीस नऊ महिने कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई देण्याचा आदेश

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group