news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

नारीशक्तीचा सन्मान ! मंगळवेढ्यात लोकमंगल बँकेच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात ; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा झाला गौरव

टीम लोकमन by टीम लोकमन
March 20, 2026
in सामाजिक
0
नारीशक्तीचा सन्मान ! मंगळवेढ्यात लोकमंगल बँकेच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात ; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा झाला गौरव

टीम लोकमन मंगळवेढा |

लोकमंगल को-ऑप बँक लि. सोलापूर शाखा-मंगळवेढा यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवेढ्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनंदा बबनराव आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजलीताई समाधान आवताडे होत्या.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड, नगरसेविका विजया गुंगे, पंचायत समिती सदस्य जयश्री कवचाळे, मोहिनी गणपाटील, नगरसेविका सीमा बुरुजे, लोकमंगल बँकेच्या संचालिका उज्वला चेळेकर, मनोज रामचंद्र पाटील (यू.पी.एस.सी पात्र-रँक- 493) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक नेते संजय चेळेकर यांनी केले.

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आरती कणिरे, विजया वाकडे, आशाताई नागणे, सुलोचना जानकर, सुलोचना इंगळे, दया वाकडे, मंगल बनसोडे, सुजाता क्षीरसागर, सानिया तांबोळी, रूपाली दत्तू, अर्चना लोखंडे, निलावती धायगोंडे, वंदना निकम, कांचन तानगावडे, गोविंदा संदेलो व शरयू सावंजी यांचा समावेश होता. कार्यक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला असून समाजातील महिलांना प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला. प्रेम, त्याग आणि समर्पण प्रतिभेच्या आभाळाला गवसणी घालणाऱ्या आपल्या तालुक्यातील अनेक माता-भगिनींचा जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कार वितरण लोकमंगल को-ऑप बँक लि. सोलापूर शाखा-मंगळवेढा यांच्यावतीने आयोजित हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो होता स्त्री-शक्तीच्या सन्मानाचा उत्सव होता.

सदरप्रसंगी क्रीडा, कला, सेवा, साहित्य, शिक्षण, उद्योग इत्यादी कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा नारीशक्ती पुरस्कार रूपाने सन्मान करण्यात आला. आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीवर भर देत, महिलांनी आता केवळ उंबरठा ओलांडायचा नाही, तर शिखर गाठायचं आहे, हा विश्वास यावेळी प्रत्येकीच्या डोळ्यात दिसत होता. कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारती धनवे यांनी केले.

Previous Post

ओव्हरटेकिंगचा नाद नडला ! 44 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Next Post

मोठी बातमी ! महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रूपाली चाकणकर यांना आदेश ; भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी चाकणकर यांच्या अडचणी वाढणार?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group