टीम लोकमन पंढरपूर |
सकल नाभिक समाज व जीवा शिवा प्रतिष्ठान पंढरपूर यांचे वतीने रविवार दिनांक ५ मे रोजी हिंदवी स्वराज्य भूषण शूरवीर शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाभिक समाजाचे युवक नेते तथा या जन्मोत्सव सोहळ्याचे संयोजक सतीश चव्हाण यांनी दिली.
रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० वाजता वीर शिवबा काशिद चौक पंढरपूर जि. सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार असून वीर शिवबा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व माजी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिद्धार्थ ढवळे सर, सुनील उंबरे, राजाभाऊ शहापूरकर, झाकीर नदाफ, सचिन कांबळे, सोहन जैस्वाल, अभय जोशी, सुनील दिवाण, नवनाथ पोरे, रवी लव्हेकर, सचिन कसबे, भारत नागणे, विनय हरिदास, संकेत कुलकर्णी, महेश भंडारकवठेकर, माऊली डांगे, अभिराज उबाळे, वीरेंद्र उत्पाद हे पत्रकार बंधू उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी डॉ. तुषार खंडागळे, डॉ. अशोक माने, भाई राजेंद्र भोसले, दिलीप गोरे, गजेंद्र माने, चंद्रकांत खंडागळे, नितीन शिंदे, श्रीकांत भोसले, परमेश्वर डांगे, किशोरभाऊ भोसले, रमाकांत शेटे, हरिभाऊ राऊत, सागर गोरे, सुधीर गाडेकर, देविदास काळे, ज्ञानेश्वर काळे, विश्वनाथ माने सर, बाळासाहेब देवकर, साईनाथ शिंदे, गणेश सुरवसे, प्रशांत वाघमारे, माऊली चौधरी, हरिभाऊ सुरवसे, मारुती भोसले, पांडुरंग यादव, पंकज माने, पुरुषोत्तम राऊत, पांडुरंग डांगे, अनिल सप्ताळ, दत्तात्रय भुसे, मोहन जमदाडे, यशवंत साळुंखे, नागेश दुधाळ, शंकर काळे, ज्योतीराम माने, लक्ष्मण विभुते, राहुल माने, जितेंद्र भोसले, धनंजय गवळी, राकेश देवकर, नारायण खंडागळे, सूर्यकांत शिंदे, बबन शेटे, औदुंबर शिंदे, भारत खंडागळे, दत्ता जाधव, दीपक सुरवसे, मुकेश भोसले, तानाजी शिंदे, रामभाऊ शिंदे, भीमराव जाधव, वैभव शेटे, मनोज दिघे, किरण भांगे, संभाजी गोरे, गौरव काळे, सुदर्शन विभुते, अभिषेक शेटे, विठ्ठल भोसले, अनिल शेटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सतीश चव्हाण यांचे नेतृत्वात यावर्षी हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन नाभिक समाजातील युवकांनी केले असून संपूर्ण पंढरपूरकरांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. या सोहळ्या बाबत युवकांमध्ये प्रचंड उत्साह असून मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या या हिंदवी स्वराज्य भूषण शूरवीर शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळ्यासाठी नाभिक समाज बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक सतीश चव्हाण, जीवा शिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश माने, उपाध्यक्ष महेश गावटे, कार्याध्यक्ष निलेश शिंदे, कोषाध्यक्ष युवराज हडपद, सचिव सागर खंडागळे, सहसचिव अविनाश शेटे, सहकोषाध्यक्ष सोमनाथ चिखले, तसेच जीवा शिवा प्रतिष्ठानचे सदस्य व सकल नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.












