news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

हायप्रोफाईल चोर ! चोरी करण्यासाठी तो चक्क विमानाने सोलापूरला यायचा ; विमानाने जाऊन चोरी करणाऱ्या चोराच्या सोलापूर पोलिसांनी मुसक्या कशा आवळल्या?

टीम लोकमन by टीम लोकमन
March 30, 2025
in क्राईम
0
हायप्रोफाईल चोर ! चोरी करण्यासाठी तो चक्क विमानाने सोलापूरला यायचा ; विमानाने जाऊन चोरी करणाऱ्या चोराच्या सोलापूर पोलिसांनी मुसक्या कशा आवळल्या?

टीम लोकमन सोलापूर |

घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आरोपीला सोलापूर गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा आरोपी घरफोडी करण्यासाठी विमानाने प्रवास करत महाराष्ट्रात यायचा. त्याच्यावर राज्यभरात तब्बल 35 गुन्हे दाखल आहे. विमानाने आलिशान प्रवास करून तो घरफोडी करायचा तसेच लखनौ येथे एक कोटीच्या आलिशान बंगल्यात राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

उत्तरप्रदेश मधून महाराष्ट्रात विमान प्रवास करून चोरटा मुंबईत यायचा. रेल्वेने तो सोलापूर गाठायचा. सोलापुरात घरफोडी केल्यानंतर परत तो उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे जात असताना मुंबईतून विमानातून प्रवास करायचा. आंतरराज्य चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी कोणी नसताना घरफोडी करून चोरी करणाऱ्या प्रकरणात आंतरराज्य गुन्हेगाराला सोलापूर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर असे अटक केलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. राजभर याच्यावर राज्यभरात तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत.

सोलापुरातील शिक्षणधिकाऱ्याच्या घरी घरफोडी

अनिल कुमार राजभर हा उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहरातील रहिवासी आहे. त्याच लखनऊ मधून तो घरफोडी करण्यासाठी विविध राज्यात जात असे, उत्तर प्रदेश येथून दुसऱ्या राज्यात चोरी किंवा घरफोडी करण्यासाठी विमानाने जात होता. त्या राज्यात गेल्यानंतर इतर शहरात जाण्यासाठी तो बाय रोड किंवा रेल्वे प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्याने सोलापुरात शिक्षणधिकाऱ्याच्या घरी घरफोडी केली आहे.

11 तोळे सोने आणि 113 ग्रॅमचे चांदीचे दागिने जप्त

उत्तर प्रदेशमध्ये परत निघून गेला मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला अनिल कुमार राजभर हा गुन्हा करण्यासाठी सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडून 11 तोळे सोने आणि 113 ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सोलापुरातील जेलरोड पोलीस आणि सिन्नर येथील गुन्हे उघडीस आले आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरात राज्यात गुन्हे दाखल

अनिल कुमार राजभर याच्या विरोधात राज्यातील विविध ठिकाणी 35 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी घरफोडी केल्यानंतर सोलापूर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत राजभर याला जेरबंद केले. उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे अनिल कुमार राजभर याचा एक कोटी रुपयांचा बंगला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनिल कुमार राजभर याच्या चोरी आणि घरफोडी करण्यासाठी जात असताना विमान प्रवासाची सगळीकडे चर्चा होत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात अनिल कुमार राजभर याच्यावर गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.

Previous Post

लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! राज्य सरकार घेणार चारचाकी वाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध ; आत्तापर्यंत 4 हजार 398 घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केली तपासणी, महिला व बालकल्याण विभाग ॲक्शन मोडवर

Next Post

अभिमानास्पद ! माढा तालुक्यातील बेंबळेचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरीचा मानकरी ; मोलमजुरी करणारे गरीब कुटुंब, घरात टीव्ही नसल्याने वेताळच्या आईने दुसऱ्यांच्या घरातील टीव्हीवर पाहिला लेकाचा विजय

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group