टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना मंगळवेढा यांचेवतीने बायोमेट्रिक व फेस रिडींग उपस्थितीनुसार वेतन प्रणाली बंधनकारक न करणेबाबतचे पत्र मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांना आरोग्य कर्मचारी यांच्यावतीने देण्यात आले.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी ग्रामविकास विभागाअंतर्गत कर्मचारी असतात. आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागास लागू असल्याचे फेस रिडींग व बायोमेट्रिक यांचा उल्लेख त्या पत्रात नमूद असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य पर्यवेक्षक हे पॅरामेडिकल, तांत्रिक क्षेत्रीय कर्मचारी आहेत. महाराष्ट्र शासन स्तरावर बायोमेट्रिक फेस रिडींग बाबत अद्याप कोणताही शासन निर्णय जीआर झालेला नाही.
पॅरामेडिकल तांत्रिक क्षेत्रीय पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित नाहीत. कर्मचारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे आंतररुग्ण विभाग व फिरती करून कार्यक्षेत्रात सेवा द्यावी लागते. अनेक प्रसंगी तातडीची तात्काळ वैद्यकीय सेवा द्यावी लागते. तसेच अपुरे मनुष्यबळ, अपुरे निवासस्थान अपूर्ण मूलभूत सुविधा तसेच एका कर्मचारीकडे दोन तीन गावांचा चार्ज इत्यादी बाबीचा विचार होणे आवश्यक आहे.
बायोमेट्रिक फेस रिडींग करता आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचे साधने मोबाईल बायोमेट्रिक मशीन सिम कार्ड डेटा पुरवण्यात आलेला नाही. कार्यक्षेत्रात दुर्गम भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसते. ऑनलाईन वेतन प्रक्रिया गेल्या दहा वर्षापासून राबविण्यात येत आहे. परंतु अद्याप एकाही महिन्यात एक तारखेची वेतन होत नाही या बाबीचा विचार होणे आवश्यक आहे. कित्येक वेळा दोन दोन महिने उशिरा वेतन होते. इत्यादी सर्व बाबीचा या प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या समस्याबाबत प्रस्तुत संघटनेसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही किंवा उचित निर्णय घेतलेला नाही. तोपर्यंत बायोमेट्रिक फेस रीडिंग द्वारा हजेरी आधारित वेतन पद्धती लागू करू नये.
ही प्रणाली लागू करण्यासाठी संघटनेसोबत चर्चा न करता एकतर्फी लागू निर्णय केला. त्यासंदर्भात सर्व पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची संघटनेमार्फत चर्चा करून निर्णय घ्यावा ही भावना आहे. अशा सर्व अडीअडचणी संदर्भात शासन स्तरावर संघटनेसोबत बैठक घेऊन उचित मार्ग काढण्यासंदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी आश्वासन दिले व कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार नाही याबद्दल शाश्वती दिली.
सदर निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रमेश पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण पवार, उपाध्यक्ष श्रीमती रूपाली तिऱ्हेकर, कार्यकारी सचिव मोहन यादव, संघटनेचे मार्गदर्शक प्रकाश पाटील, नागनाथ लंगोटे, प्रमोदकुमार म्हमाने, श्रावण मोरे, रमेश माने, संजय कमळे, जयसिंग हेंबाडे, जितेंद्र साळुंखे, प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल क्षीरसागर, संघटक रावसाहेब गरंडे, जिल्हा परिषद तांत्रिक सोसायटीचे चेअरमन श्रीमंती सलगर, महिला प्रतिनिधी टि एन सलगर, शैला जाधव, कविता शिवशरण, जगदेवी राऊत, श्रीमती गददे, प्रमिला पवार, श्रीमती हुलवान, श्रीमती हिरेमठ, श्रीमती मुजावर, आरोग्य कर्मचारी प्रल्हाद नाशिककर, राजगुरू, अजय जाधव, मनोज पाटील, रणजीत लेंडवे, नीलकंठ जाधव, गुंडोपंत लेंडवे, संजय गांडुळे, अस्लम मुल्ला, जमीर इनामदार, सुरज गंधाले, अजय गोरे, मुलाणी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.