news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पैशांच्या देवाण घेवाणीतून गळा दाबून केला खून त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले, पंधरा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा पोलिसांकडून अखेर उलगडा ; आरोपी जेरबंद, सांगोला व सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

टीम लोकमन by टीम लोकमन
July 28, 2024
in क्राईम
0
पैशांच्या देवाण घेवाणीतून गळा दाबून केला खून त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले, पंधरा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा पोलिसांकडून अखेर उलगडा ; आरोपी जेरबंद, सांगोला व सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

टीम लोकमन सांगोला |

मागील 15 महिन्यापुर्वी अज्ञात आरोपीने, अज्ञात इसमाचा, अज्ञात कारणाने खुन करुन त्याचे प्रेत 100 टक्के जाळुन ओळख संपविलेली असता सोलापुर शहर आणि सोलापुर ग्रामीण कडील पथकांनी कसोसीने समांतर तपास करुन गुन्हयातील मयताची ओळख पटवुन आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली.

आरोपी विशाल बनसोडे (वय 36 वर्षे, रा सावित्रीबाई फुले हौसींग सोसायटी, संभाजीपुर, नांदणी रोड, जयसिंगपुर ता.शिरोळ जि कोल्हापुर) यास अटक करुन दिनांक 27 जुलै 2024 रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक 03 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

सांगोला तालुक्यातील मौजे अनकढाळ गावाचे शिवारात नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणारे रस्त्यापासुन पुर्व बाजुला असलेल्या कुटे मळयाकडे जाणारे कच्च्या रस्त्याचे उत्तरेस, नाला बल्डींगच्या बांधालगतच्या वारीत लिंगे यांचे शेतामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा इसम जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. सदर इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरून जिवे ठार मारून अंगावर काहीतरी ओतुन पेटवून देवुन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणुन मौजे अनकढाळ येथील बाळासो पाटील यांनी फिर्यादी जबाबावरून दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी 02:26 वा सांगोला पोलीस ठाणे गु र नं 326/2023 भादवि कलम 302, 201 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास मंगळवेढा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करीत आहेत. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे यातील मयताच्या वर्णनाचा इसम मिसींग झाल्याबाबत मिसींग क्रमांक 36/2023 दिनांक 11 एप्रिल 2023 प्रमाणे दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास सोलापुर शहर कडील करीत होते.

त्याप्रमाणे रमन साबळे (वय 36 वर्षे, रा. 151 लक्ष्मी पेठ, देगाव रोड सोलापुर) याचे मिसींगबाबत समांतर तपास करीत असताना, त्याचा खुन मिसींग व्यक्तीचा व्यावसायिक भागीदार विशाल बनसोडे याने केल्याची माहिती मिळालेने त्यास कोल्हापुर येथुन 5.30 वा ताब्यात घेवुन मिसींग व्यक्तीबाबत त्याचेकडे सखोल चौकशी केली असता विशाल बनसोडे याने दिनांक 11 एप्रिल 2023 चे रात्री अनकढाळ टोल नाक्याजवळ त्या दोघांमध्ये पैशाचे देवाण घेवाणीचे कारणावरून वाद झाला. त्यातुन त्याने रमन साबळे यास मारहाण करून गळा दाबुन खुन केला. त्यानंतर पेट्रोल व डीझेल आणुन मयत रमन साबळे याचे शरीरावर टाकुन त्याचे शरीर ओळखु येवु नये याकरीता जाळून टाकले असल्याचे सांगितले आहे.

याबाबत सांगोला पोलीस ठाणेच्या अभिलेखावर अज्ञात आरोपीविरुध्द खुन करुन पुरावा नाहीसा केल्याचा गंभीर गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपी नामे विशाल बनसोडे यास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटिल गुन्हे शाखा सोलापुर व त्यांचेकडील तपास पथकाने सांगोला पोलीस ठाणे येथे समक्ष हजर केल्याने त्यास सांगोला पोलीस ठाणे कडील गु र नं 326/2023 भादवि कलम 302, 201 या गुन्हयात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक 26 जुलै 2024 रोजी 11 वाजता सदर नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.

सदर कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व तपास पथक तसेच सोलापुर शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा सोलापुर यांचेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील व तपास पथक यांनी केली आहे.

Previous Post

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पेन्शन आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे आवाहन : जिल्हाध्यक्ष सुरेश पवार

Next Post

…..तर सर्व पदांचा त्याग करून 100 टक्के राजकारणातून संन्यास घेणार, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा ; काय आहे कारण?

Next Post
…..तर सर्व पदांचा त्याग करून 100 टक्के राजकारणातून संन्यास घेणार, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा ; काय आहे कारण?

.....तर सर्व पदांचा त्याग करून 100 टक्के राजकारणातून संन्यास घेणार, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा ; काय आहे कारण?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group