news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बनच्या वतीने मंगळवेढा येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न ; मंगळवेढा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचाही झाला सन्मान

टीम लोकमन by टीम लोकमन
January 22, 2026
in सामाजिक
0
एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बनच्या वतीने मंगळवेढा येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न ; मंगळवेढा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचाही झाला सन्मान

टीम लोकमन मंगळवेढा |

उद्योग, व्यवसाय, कृषी, सहकार आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय महिला अर्बन तसेच एलकेपी मल्टीस्टेटच्या वतीने मंगळवेढा शहरातील दादासाहेब नागणे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये मंगळवेढा शहर आणि परिसरातील लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ महिला भगिनींच्या मोठ्या गर्दीमध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

सोलापूर जिल्ह्यातील उद्योग आणि व्यवसायिकांचा आर्थिक कणा समजली जाणारी सूर्योदय महिला अर्बन या संस्थेची मंगळवेढा शाखा तसेच सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या एलकेपी मल्टीस्टेटच्या मंगळवेढा शाखेच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी उद्योजिका, विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिला अधिकारी, गृहिणी, शेतकरी तसेच शेतमजूर महिला अशा विविध स्तरातील भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मंगळवेढा शहरातून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनंदाताई बबनराव आवताडे, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, नवनिर्वाचित नगरसेवक सोमनाथ हुशारे, सीमा बुरजे, विजया गुंगे, सोमनाथ माळी, मनीषा मेटकरी, नागर गोवे, अश्विनी धोत्रे, सावित्री कोंडूभैरी इत्यादी सत्कारमूर्तींचा समावेश होता.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक भारत मुढे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या खास शैलीत घेतलेल्या “खेळ पैठणीचा” कार्यक्रमात उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सहभागी महिलांनी निसंकोचपणे प्रत्येक मनोरंजनात्मक खेळामध्ये सहभाग दाखवत या कार्यक्रमाला मनमुरादपणे दाद दिली. होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी महिलांना आयोजकांच्या वतीने विशेष बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमात मोनाली रंधवे यांनी मानाची पैठणी मिळवली तर पद्मिनी लुगडे यांनी सोन्याची नथ जिंकली. तसेच सारिका नागणे आणि सारिका जाधव यांनी देखील नथ मिळवत खेळाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमात सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी सुरुवातीलाच आपल्या प्रस्ताविकात सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेट मधील सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा आणि विविध योजना सांगत उपस्थित महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच शेतकऱ्यांसाठी, सरकारी नोकरदारांसाठी असलेल्या कर्ज योजनाबद्दल त्याचबरोबर सोनेतारण कर्जाबद्दल सखोल माहिती सांगितली. या दोन्ही संस्थांनी सामान्यजणांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून ग्राहकांच्या अतूट विश्वासावर आणि जनसामान्यांच्या आशीर्वादावर आपली यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही अनिलभाऊ इंगवले यांनी यावेळी सांगितले.

मंगळवेढ्याच्या नूतन नगराध्यक्षा सुनंदाताई अवताडे तसेच उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत आणि नगरसेवक सोमनाथ माळी यांनीही यावेळी उपस्थित महिलांसमोर मार्गदर्शन करताना या संस्थांनी फक्त आर्थिक व्यवहारा पुरताच मर्यादित विचार न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून सूर्योदय महिला अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटने जनमाणसाच्या हृदयात आपुलकीचे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले.

यावेळी मंचावर सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन अर्चनाताई इंगवले, लता अवताडे, गणेश धोत्रे, नितीन मेटकरी, सचिन नागणे, वैभव लेंडवे, दत्तात्रय भुसे, योगेश पवार, दत्तात्रय माने व सोमनाथ सावंत, संचालक संतोष इंगवले, मोहन इंगवले तसेच सीईओ अजित दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन देखील सर्व प्रकारच्या उत्तम सुविधेसह अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम संपन्न झाल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या दोन्ही संस्थांतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

कौतुकास्पद ! महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या शासकीय रेखाकला परीक्षेत मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; 12 विद्यार्थ्यांना मिळाली ‘ए’ श्रेणी

Next Post

जल जीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ‘जल सेवा आंकलन’ उपक्रमाची होणार प्रभावी अंमलबजावणी ; ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचेही होणार मूल्यांकन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group