news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गुरुजी तुम्ही सुद्धा ! पाण्यातून गुंगीचे औषध देऊन मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार ; गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन by टीम लोकमन
February 13, 2025
in क्राईम
0
धक्कादायक ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ; शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

पोलिस अकॅडमी दाखवितो म्हणून कारमध्ये विद्यार्थिनीला तामसा येथून घेऊन निघालेल्या मुख्याध्यापकाने पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार करीत पीडितेला गर्भवती केले.

ही बाब कुटुंबीयांना समजल्यानंतर या प्रकरणात तामसा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी तामसावासीयांनी कडकडीत बंद पाळण्यात आला.

पीडित मुलीचे आईवडील हे एका शिक्षकाच्या शेतात राहतात तर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीत असून ती शिक्षणासाठी तामसा येथील मामाकडे राहत होती. शाळेतील मुख्याध्यापक राजूसिंह चौहान हा जे विद्यार्थी इंग्रजीत कच्चे आहेत त्यांच्यासाठी वेगळा वर्ग घेत असे. त्यातून मुख्याध्यापक चौहान आणि पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख झाली. तसेच पुढे चौहान याचे पीडितेच्या वडिलांशी बोलणेही वाढले. पीडितेला पोलिस बनून आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा होता. ही बाब मुख्याध्यापक चौहान याला समजल्यानंतर त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगून नांदेडला पोलिस अकॅडमी पाहण्यासाठी घेऊन जातो असे सांगितले. पीडितेच्या आई-वडिलांनीही मुख्याध्यापकावर विश्वास ठेवत जाण्यास परवानगी दिली.

त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये दिवाळीच्या सुट्टीत मुख्याध्यापक चौहान हा आपल्या चारचाकीत विद्यार्थिनीला घेऊन नांदेडला निघाला होता. सोबत अन्य मुली असल्याचे त्याने पीडितेला सांगितले होते. परंतु कुणीही आले नाही. तामसा रस्त्यावर एका ठिकाणी कार थांबवून चौहान याने गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पीडितेला पिण्यासाठी दिले. त्यामुळे विद्यार्थिनीची शुद्ध हरपली अन् चौहान याने तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर येताच पीडितेला ही बाब समजली. यावेळी चौहान याने तुझा व्हिडीओ काढला असून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने याबाबत कुठेच वाच्यता केली नाही.

त्यानंतर चौहान याने काही दिवसांनंतर पुन्हा पीडितेला शाळा सुटल्यानंतर तामसा बसस्थानक परिसरात असलेल्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने कोणता व्हिडीओ आहे याबाबत विचारणा केली असता चौहान याने व्हिडीओ दाखविला नाही. त्यानंतरही अनेक वेळा चौहान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. त्यात पीडिता गर्भवती राहिली. ही बाब चौहान याला समजल्यानंतर नांदेडातील एका रुग्णालयात आणून तिचा गर्भपात करण्यात आला.

10 फेब्रुवारी राेजी पीडितेचे मामा तिला नेण्यासाठी गावात आले असता पीडितेच्या आईने चौकशी केली. त्यानंतर पीडितेने आपबिती सांगितली. या प्रकरणात तामसा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक राजूसिंह चौहान याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित शाळा राजकीय व्यक्तीची

गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्याध्यापक विद्यार्थिनीवर अत्याचार करीत होता. त्यात काही दिवसांपूर्वीच ही बाब उघडकीस आली होती. परंतु संबंधित शाळा ही राजकीय पुढाऱ्याशी संबंधित असल्यामुळे कारवाईसाठी चालढकल करण्यात येत होती. शेवटी बुधवारी पहाटे या प्रकरणात गुन्हा नोंद झाला.

नांदेडमध्ये केला गर्भपात…

मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याने विद्यार्थिनी गर्भवती झाली. ही बाब तिने मुख्याध्यापकाला सांगितली. अगोदर त्याने त्याच्याजवळील गोळी दिली परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. म्हणून तिला कारमध्ये बसवून नांदेड येथे आणण्यात आले. या ठिकाणी एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनीचा गर्भपात नेमका कोणत्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आला याचाही आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास व आदर्श असताना आजची तरुण पिढी एवढी डिप्रेशन मध्ये कशी? : व्याख्याते निलेश चव्हाण

Next Post

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज मंगळवेढा येथे युवाशाहीर अविष्कार देशिंगे पोवाड्यातून गाणार पराक्रम व शौर्याची गाथा ; सीमा परिचारक, डॉ. प्रणिता भालके, सुनंदा आवताडे, शोभा काळुंगे, अरुणा माळी, तेजस्विनी कदम, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. आसावरी घोडके यांची उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group