news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गुड न्यूज ! एसटीच्या चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता ; उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा अभिनव उपक्रम, वाढीव उत्पन्नावर मिळणार रोख रक्कम, चालक वाहकांमध्ये उत्साह

टीम लोकमन by टीम लोकमन
September 26, 2024
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्रात पुन्हा लालपरीची चाके थांबणार, एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत ; 2021 मध्ये झाला होता सलग 54 दिवस संप, काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

टीम लोकमन मंगळवेढा |

महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीच्या चालक-वाहकांना आता 20 टक्के प्रोत्साहन भत्ता दिल्या जाणार आहे. प्रवासी वाहतूक करीत असलेल्या चालक वाहकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्याचे निश्चित झाल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.

चालक-वाहक महत्त्वाचा घटक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ऑगस्ट 2024 या महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्न वाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगीक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

योग्य कामगिरी करणार्‍यांनाच प्रोत्साहन भत्ता

विशेषत: प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तणुक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नसल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. योग्य कामगिरी करणार्‍या चालक व वाहकांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर योजना पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार

विविध उपयोजना व अभिनव उपक्रमाव्दारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपले उत्पन्न वाढविण्यास सुरुवात केली आहे. प्रवासी राजा, कामगार, पालक दिन यासारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या व कर्मचार्‍यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

एसटीच्या चालक व वाहकांना प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. अतिरिक्त उत्पन्न आणणार्‍या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात दिली जाणार आहे.

Previous Post

माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश ; राज्यातील नेत्यांचा तुतारीकडे ओढा कायम

Next Post

धक्कादायक ! भर बाजारात पतीने अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले, घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू ; हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला, फरार पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group