टीम लोकमन जत |
आयुर्वेदाच्या काश्यप संहितेत वर्णन केलेले व प्रज्ञाविवर्धन स्त्रोताने सिद्ध केलेले सुवर्णप्राशन श्री दत्त क्लिनिक जत येथे प्रत्येक महिन्याच्या पुष्पनक्षत्रादिवशी उपलब्ध असून फेब्रुवारी महिन्यातील सुवर्ण प्राशन संस्कार मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व श्री दत्त क्लिनिकचे संचालक डॉ. सचिन वाघ यांनी दिली.
जत येथील मार्केट यार्ड समोर असणाऱ्या डॉक्टर वाघ यांच्या श्री दत्त क्लिनिक येथे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत सुवर्णबिंदू प्राशन होणार असल्याचे श्री दत्त क्लिनिकच्या संचालिका डॉ. मेघाराणी सचिन वाघ यांनी सांगितले.
दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे… वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे… आयुर्वेदात सुवर्णबिंदू प्राशन संस्काराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. नवजात बालकांपासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींसाठी प्रत्येक महिन्याच्या पुष्प नक्षत्रादिवशी सुवर्णबिंदू प्राशन केले जाते.
सुवर्णप्राशनाचे घटक
शुद्ध सुवर्ण, पिंपळी, वचा, मंडूकपर्णी, शंखपुष्पी, ब्राम्ही इत्यादी दिव्य वनस्पती शुद्ध मध व बुद्धीवर्धक घृत यांचे मिश्रण करून सुवर्णप्राश तयार होतो.
वयोगट
नवजात बालकांपासून ते वय वर्षे 12 पर्यंतच्या सर्व मुला-मुलींसाठी प्रत्येक महिन्याच्या पुष्प नक्षत्रादिवशी सुवर्ण बिंदू प्राशन संस्कार केला जातो.
सुवर्णबिंदू प्राशनाचे फायदे
बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती वाढते, बुद्धी कुशाग्र व तल्लख होते, एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते, मुलांची पचनशक्ती वाढवून मुलं सुदृढ होतात, शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होते, मुले चपळ व हुशार होतात, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व मानसिक वाढीमध्ये न्यूनता असणाऱ्या बालकांसाठी हे सुवर्णबिंदू प्राशन अत्यंत उपयोगी आहे.
जत येथील डॉक्टर वाघ यांच्या श्री दत्त क्लिनिक येथे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत नवजात बालकांपासून ते बारा वर्षाच्या मुला-मुलींसाठी होणाऱ्या सुवर्णबिंदू प्राशन संस्काराचा जास्तीत जास्त बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त क्लिनिकचे संचालक डॉ. देवानंद वाघ यांनी केले आहे.