news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गणेश चतुर्थी 2024 ! शनिवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे वाजत गाजत होतेय आगमन ; उद्या ‘या’ वेळेतच करा बाप्पाची प्रतिष्ठापना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना कधी करावी? पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितला शुभमुहूर्त

टीम लोकमन by टीम लोकमन
September 6, 2024
in सांस्कृतिक
0
गणेश चतुर्थी 2024 ! शनिवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे वाजत गाजत होतेय आगमन ; उद्या ‘या’ वेळेतच करा बाप्पाची प्रतिष्ठापना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना कधी करावी? पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितला शुभमुहूर्त

टीम लोकमन मंगळवेढा |

आपणा सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या एक दिवसांवर आले असून उद्या शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी ब्राह्ममुहर्तापासून म्हणजे पहाटे 4.50 ते दुपारी 1.51 पर्यंत आपल्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते. अशी माहिती सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

10 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 04 मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री 9.53 पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.

17 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून 11 वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल, तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणे बारा वाजताच संपत असली तरीही त्यानंतर देखील विसर्जन करता येईल.

विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा आपण देत असतो. त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार असल्याची माहितीही पंचांगकर्ते दाते यांनी दिली.

Previous Post

मोठी बातमी ! भिवापूर जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; ट्रॅव्हल्स मधील चौघांचा जागीच मृत्यू, तर 22 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

Next Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा ; डॉ. नंदकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने शिक्षकांसोबतच मावशी आणि मामांचा देखील झाला सन्मान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group