टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने बोराळे ता. मंगळवेढा येथे आज शनिवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ८३ गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत शिंदे यांनी दिली.

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरात मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन व आयसीयू तज्ञ डॉ. मनीष बसंतवाणी व अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर यांनी रुग्णांची तपासणी केली. वारंवार धाप लागणे, छातीत दुखणे, पायऱ्या चढताना दम लागणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, चक्कर येणे अशी विविध लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरामध्ये येऊन तपासणी करून घेतली.
या शिबिरामध्ये रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या.

१३ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे येथे सकाळी १० ते २ यावेळेत हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. गरजू रुग्णांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, या शिबिराचे समन्वयक संतोष कोळसे, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा शेख, डॉ. मयुरी काटकर, आरोग्य सेवक रमेश पाटील, आरोग्य सेविका पुजा शिंदे, मल्लम्मा कमळे, आशा गटप्रवर्तक सरोजा गवळी व सीमा रणदिवे, बाळूमामा नाईकवाडी, साक्षी पुजारी, प्रतीक बनसोडे, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ हेगडे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वाहन विभागप्रमुख नितीन घाटुळे यांनी परिश्रम घेतले.








