टीम लोकमन पंढरपूर |
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 10.02.2025 ते 16.02.2025 या सप्ताहात खेडभाळवणी ता. पंढरपूर येथे विशेष श्रमसंस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये दि.13.02.2025 रोजी महिला आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदरील शिबीरासाठी पंढरपूरच्या नामवंत डॉ. संगीता पाटील, डॉ. क्षितीजा कदम-पाटील उपस्थित होत्या. त्यांनी खेडभाळवणी येथील शिबीरामध्ये मोफत महिलांची आरोग्य तपासणी केली. सदरील शिबीरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 100 हून अधिक महिलांनी येऊन आपली तपासणी करुन घेतली व औषधोपचार घेतले. डॉ. संगीता पाटील आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ आरोग्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, निरोगी आरोग्य हीच खरी आयुष्यातील संपत्ती आहे. नसावा अंगी आळस… असावी अंगणी तुळस… स्वीकारू नये अवैद्य… नाकारू नये वैद्य… राहील निरोगी आरोग्य!!….
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, सौ. निशा करांडे मॅडम, संगीता कुलकर्णी, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा.सुमित इंगोले, प्रा.मासाळ, प्रा.अजित करांडे , प्रा. गुरुराज इनामदार, व एन एस एस चे प्रेसिडेंट अथर्व कुराडे, सेक्रेटरी किशोर नरळे, नाना वाघमारे, सत्यम कापले, प्राप्ती रुपनर, तेजस्वी खांडेकर, अनुप नायकल, चेतन मासाळ, वैष्णवी पडगळ, आकांक्षा कवडे, सुमित अवताडे, आकाश चौगुले, प्राजक्ता डोंगरे, रशीद पठाण, हर्षद शिंदे यांनी परिश्रम घेतले.