news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आज शिरसी येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; डॉ. जस्मिन शेख, डॉ. भाऊसाहेब जानकर, डॉ. नंदकुमार शिंदे, बाबासाहेब कसबे यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
January 7, 2026
in आरोग्य
0
आज शिरसी येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; डॉ. जस्मिन शेख, डॉ. भाऊसाहेब जानकर, डॉ. नंदकुमार शिंदे, बाबासाहेब कसबे यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अभिजीत बने यांनी दिली.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांच्या शुभहस्ते व रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अभिजीत बने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी सचिन सोनवणे, शिरसीचे सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावातील हनुमान मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवरील तज्ञ व नामवंत डॉक्टरांचा सल्ला, तपासणी व औषधे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. बी एम फार्मा या कंपनीने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी (एमएमएस) हॉस्पिटल, ग्रामपंचायत शिरसी, लाईफस्टाईल ब्युटी पार्लर मंगळवेढा, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज मंगळवेढा यांच्या विशेष सहकार्याने हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होत आहे.

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर ओंकार कुलकर्णी MD. Medicine फिजिशियन, डॉक्टर अरुणकुमार महिंद्रकर MBBS. D. Ortho, DNB अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर महेश कोनळळी MBBS. DCH बालरोग व नवजात शिशु तज्ञ, डॉक्टर पुष्पांजली शिंदे MBBS. MD. OBGY. DNB स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ, डॉक्टर विजय नडगेरी MBBS, MS जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन, डॉक्टर स्मिता नडगेरी MBBS. DGO स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ, डॉक्टर अमित मेनकुदळे MBBS. DDV स्किन, हेअर व कॉस्मेटोलॉजिस्ट, डॉक्टर दीपेंद्र हुली MBBS. MS. ENT. कान नाक घसा तज्ञ, डॉक्टर स्वानंद महाजन BDS. MDS. (Orthodontist) Felloship in Advance Dentistry & Implatology डेंटल सर्जन हे सर्व नामवंत तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला व तपासणी करणार आहेत.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासोबत ब्लड शुगर, ब्लडप्रेशर व गरजेनुसार ECG मोफत करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना उपलब्ध औषधे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. शिरसी येथील हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणात होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची नोंदणी बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी आणि ग्रामपंचायत शिरसी यांचेवतीने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची तयारी करण्यात आली आहे. रोटरी क्लब मंगळवेढा सिटी यांचेवतीने या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख म्हणून राखी जाधव व सहप्रकल्प प्रमुख म्हणून अमोल रत्नपारखी, असिफ मुल्ला, मल्लय्या स्वामी, उमेश मर्दा, रेवय्या हिरेमठ, विष्णू गोदे, चंगेजखान इनामदार, सोमनाथ इंगळे हे काम पाहत आहेत.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी शिरसी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले असून सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव यांचेसह ग्रामपंचायत सदस्य या शिबिराचे यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. शिरशी परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी कुलदीप रजपूत यांनी केले आहे.

Previous Post

सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र यादव यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर

Next Post

मोठी बातमी ! कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात ; कारमधील दोघांचा जागीच मृत्यू, वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये जखमींवर उपचार सुरु

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात ; कारमधील दोघांचा जागीच मृत्यू, वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये जखमींवर उपचार सुरु

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group