टीम लोकमन मंगळवेढा |
इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयात नापास विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज मंगळवेढा येथे रविवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रशालेच्या उपप्राचार्य तेजस्विनी कदम यांनी दिली.
इयत्ता बारावीतील इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत मार्गदर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अनिल बागडे, पी. डी. लायन्स कॉलेज मालाड मुंबई व तुषार बागवे, सोमय्या कॉलेज मुंबई हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या प्रदीर्घ अनुभवातून इयत्ता बारावीचा इंग्रजी पेपर कसा सोडवावा व हमखास पास होण्यासाठी कोणत्या युक्त्या वापराव्यात याविषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमधील शास्त्र, वाणिज्य, कला, व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन येणाऱ्या बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन करावे असे आवाहन संयोजिका व इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम यांनी केले आहे.