टीम लोकमन मंगळवेढा |
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचे वतीने शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी 1000 शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंतरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती क्लबचे प्रेसिडेंट रोटे. अमोल रत्नपारखी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक व सुप्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर सचिन बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने 1000 शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंतरोग तपासणी 12 नामवंत डेंटल सर्जन कडून करण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा येथील डेंटल सर्जन उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मरवडे, जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मरवडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर मंगळवेढा या शाळांमधील मुलांची मोफत दंतरोग तपासणी करण्यात येणार असून उपस्थित तज्ञ डॉक्टर्स मुलांना दातांचे आरोग्य, महत्त्व, घ्यावयाची काळजी व दातांची स्वच्छता या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
या मोफत दंतरोग तपासणी शिबिरासाठी सोलापूर येथील सुप्रसिद्ध डेंटल सर्जन डॉ. अमित गायकवाड-पाटील, डॉ. अश्विनी दौंड, पंढरपूर डेंटल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉ. कीर्ती गांधी, डॉ. सचिन बनसोडे, डॉ. अतुल भालके, डॉ. सिद्धार्थ शिंदे, डॉ. ओंकार पाटील, डॉ. स्वानंद महाजन, डॉ. निकिता सारडा, डॉ. कश्मीरा रत्नपारखी आदी नामवंत डेंटल सर्जन उपस्थित राहून विद्यार्थ्यांची मोफत दंतरोग तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी रोटे. अभिजीत बने यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 1000 शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंतरोग तपासणी उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे ट्रेझरर व या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन रोटे. उमेश मर्दा, को प्रोजेक्ट चेअरमन रोटे. मेजर मल्लय्या स्वामी, रोटे. असिफ मुल्ला यांचेसह रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.