news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ यांची आज बिळूर येथे जाहीर सभा, ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेतही होणार सहभागी ; निवृत्ती शिंदे सरकार, जी. आर. पाटील यांची माहिती

टीम लोकमन by टीम लोकमन
August 1, 2024
in राजकीय
0
माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ यांची आज बिळूर येथे जाहीर सभा, ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेतही होणार सहभागी ; निवृत्ती शिंदे सरकार, जी. आर. पाटील यांची माहिती

जत : पांडुरंग कोळळी

जत तालुक्याच्या विविध प्रश्नासाठी तम्मनगौडा रविपाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेमध्ये माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ हे सहभागी होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांची बिळूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पदयात्रेचे प्रमुख संयोजक निवृत्ती शिंदे सरकार व संखचे नेते जी. आर. पाटील सर यांनी पत्रकारांना दिली.

भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनकल्याण संवाद पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा संख मुक्कामी दाखल झाली. यावेळी पदयात्रेतील प्रमुख नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, भाजप युवा मोर्चाचे पिरू कोळी हेही उपस्थित होते.

निवृत्ती शिंदे सरकार म्हणाले की, जत तालुक्यातील पहिली ऐतिहासिक पदयात्रा उमदी येथून दिमाखात सुरु झाली आहे. मागील दोन दिवसात या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात महिला भगिनी पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. या पदयात्रेमध्ये कर्नाटकातील येतनाळचे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील हे सहभागी होणार आहेत. दिनांक १ ऑगस्ट रोजी त्यांची बिळूर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

बसवराज पाटील म्हणाले की, तम्मनगौडा रविपाटील यांनी जत तालुक्यामध्ये नवा इतिहास घडविला आहे. जनतेच्या प्रश्नासाठी संपूर्ण तालुक्यात पदयात्रा करण्याचा ऐतिहासिक उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. त्याला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनसंवाद पदयात्रेचे गावोगावी प्रचंड स्वागत होत आहे. बिळूर येथे होणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ यांच्या सभेसाठी पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

जत तालुक्यातील गुड्डापूर येथे नऊ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कर्नाटक भवनचे आज उद्घाटन ; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, आमदार विक्रमसिंह सावंत यांची उपस्थिती

Next Post

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार? तारीख आणि महिना सुद्धा ठरला ; फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी? महायुतीकडून संकेत

Next Post
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार, 26 जूनला मतदान ; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार? तारीख आणि महिना सुद्धा ठरला ; फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी? महायुतीकडून संकेत

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group