news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

माजी आमदार दिलीप माने कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात ; यासाठी घेतली ‘माने’ यांनी ‘आशीर्वाद’ यांची भेट

टीम लोकमन by टीम लोकमन
May 20, 2024
in ताज्या घडामोडी
0
माजी आमदार दिलीप माने कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात ; यासाठी घेतली ‘माने’ यांनी ‘आशीर्वाद’ यांची भेट

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

सुंदरमनगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी माने यांनी यावेळी केली. गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली. मात्र केवळ पाच तालुक्यांचाच समावेश दुष्काळी तालुके म्हणून करण्यात आला. तर उर्वरित सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही दुष्काळी मदत मिळाली नसल्याचे सांगून दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले जात असून शेतकऱ्यांना खरीप पिके पेरणीसाठी आवश्यक असलेली खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कुमठे ता. उत्तर सोलापूर येथील लमान तांड्यावर 1200 मतदार असून मतदारांचे सोयीसाठी लमाणतांडा येथे मतदान केंद्र असणे आवश्यक आहे. येथील मतदार संख्या, परिसरातील व वस्तीवरील मतदारांच्या सोयीसाठी कुमठे लमान तांडा येथे मतदान केंद्र करण्याची मागणी केली. साखरेवाडी ता. उत्तर सोलापूर या गावामध्ये सुमारे 700 मतदार असून येथील नागरिकांना अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमण येथे मतदानास यावे लागते. त्यामुळे मतदार मतदानाचा हक्कापासून वंचित राहतात. त्यांचे सोयीसाठी साखरेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र करण्यात यावे अशी मागणी माने यांनी यावेळी केली.

यावेळी गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, बाळासाहेब पाटील, संजय जाधव, उमेश भगत, ज्ञानोबा साखरे, महेश घाडगे, सतीश मस्के, गणपत बचुटे, नितीन भोपळे, अनिल हिबारे, रेवनसिद्ध साखरे, अजय बचुटे, सुनील जाधव, अजय सोनटक्के, मुजफ्फर जहागीरदार, गुरुबाळा पाटील, संजय लोणारी, रवींद्र पाटील, अमोगसिद्ध पाटील, अशोक कलशेट्टी, बसवराज पाटील यांचेसह आमदार दिलीप माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतिगिरी महाराजांवर तहसीलदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल ; महाराजांना ‘हे’ कृत्य करणे आले अंगलट

Next Post

जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा दहावी सीबीएसई बोर्डाचा 95 टक्के निकाल ; गुणवंतांचा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला गौरव

Next Post
मोठी बातमी ! अखेर प्रतीक्षा संपली ; बारावीचा निकाल ‘या दिवशी’ जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा

जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा दहावी सीबीएसई बोर्डाचा 95 टक्के निकाल ; गुणवंतांचा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला गौरव

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group