news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

बापरे ! देशातील अठरा लाख मोबाईल सिमकार्ड पडणार बंद, सरकार ॲक्शन मोडवर ; मोबाईल धारक चिंतेत, ‘हे’ कारण आले समोर

टीम लोकमन by टीम लोकमन
May 20, 2024
in ताज्या घडामोडी
0
बापरे ! देशातील अठरा लाख मोबाईल सिमकार्ड पडणार बंद, सरकार ॲक्शन मोडवर ; मोबाईल धारक चिंतेत, ‘हे’ कारण आले समोर

टीम लोकमन मंगळवेढा |

भारत सरकारच्या सुचनेवरुन दूरसंचार विभाग सायबर क्राईम आणि ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी एकाचवेळी 18 लाख सिमकार्ड आणि यापेक्षा अधिक मोबाइल कनेक्शन खंडित करू शकते. अशी मोठी माहिती समोर येत आहे. या वृत्ताने खळबळ माजली असून या 18 लाख सिम कार्डमध्ये आपले सिम तरी नाही ना? या विचाराने अनेक मोबाईलधारक चिंतेत आहेत.

9 मे रोजी दूरसंचार विभागाने Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्यांना 28,220 मोबाइल बँड बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची फेरतपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

केंद्र सरकारने देशातील सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणूक दूर करण्यासाठी एक मोहिम आखली आहे. या मोहिमेंतर्गत केंद्र सरकार सरकारी आणि खासगी एजन्सीच्या मदतीने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे. रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाईल कनेक्शन आणि सिमकार्ड पुन्हा रीवेरिफिकेशन करतील. त्यानंतर ते त्यांना ब्लॉक ही करू शकतील. महत्वाचे म्हणजे, येत्या 15 दिवसांमध्ये बनावट मोबाईल आणि सिमकार्ड बंद करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना सरकारकडून देण्यात आले आहे.

देशात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ
ET च्या एका अहवालानुसार, देशात मोबाईलवरील सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) नुसार तर, 2023 मध्ये डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे सुमारे 10,319 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 694,000 तक्रारी प्राप्त मध्ये झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सायबर फसवणुकीत अडकलेली 37 हजार सिमकार्ड बंद करण्यात आली आहेत. यासह 1,86,000 हँडसेट ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठीच ही महत्त्वाची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत वापरकर्त्यांचे मोबाईल बंद करण्यासोबतच सिमकार्डही ब्लॉक करण्यात येणार आहे. पुढे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. केंद्र सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे सायबर क्राईमच्या आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

मोठी बातमी ! अखेर प्रतीक्षा संपली ; बारावीचा निकाल ‘या दिवशी’ जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा

Next Post

नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतिगिरी महाराजांवर तहसीलदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल ; महाराजांना ‘हे’ कृत्य करणे आले अंगलट

Next Post
नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतिगिरी महाराजांवर तहसीलदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल ; महाराजांना ‘हे’ कृत्य करणे आले अंगलट

नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतिगिरी महाराजांवर तहसीलदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल ; महाराजांना 'हे' कृत्य करणे आले अंगलट

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group