news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगोला शहराजवळ मालट्रक व कारचा भीषण अपघात ; अपघातात दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी, तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतत असताना भाविकांवर काळाचा घाला

टीम लोकमन by टीम लोकमन
October 7, 2024
in क्राईम
0
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

टीम लोकमन सांगोला |

तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांचा भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नागपूर महामार्गावरील सांगोला शहरानजीक चिंचोली बायपास येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

सुखदेव बामणे वय 40 व नैनेश कोरे वय 31 दोघेही रा. नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे वय 42 राहणार नांदणी, सुधीर चौगुले वय 35 राहणार वडगाव, सुरज विभुते 21 राहणार कोथळी हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक, सांगोला पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोडवरुन बाजूला काढून जखमींना उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी MH 09 FB 3908 या वॅगनार कारमधून तुळजापूर येथे नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर नागपूर रत्नागिरी महामार्गावरुन नांदणी जि. कोल्हापूर इथे गावाकडे निघाले होते. परंतु रस्त्यात सांगोला शहरानजीक चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी MP 20 ZM 9518 या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

Previous Post

मोठी बातमी ! भरधाव टेम्पोची कारला जोरदार धडक, पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या अपघातात माय लेकरासह चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी ; कास पठार फिरण्यासाठी निघालेल्या चौघांवर काळाचा घाला

Next Post

महिलांसाठी आनंदोत्सव ! बालरंगभूमी परिषद, शिवशंभो प्रतिष्ठान यांचेवतीने व तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेतून आज मंगळवेढ्यात भव्य दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन ; सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के यांची प्रमुख उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group