टीम लोकमन नांदेड |
नांदेड येथील शिवसेना शाखाप्रमुख कृष्णा कंठेवार यांची राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या शहर युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना मराठवाडा विभागीय अध्यक्षा उज्वलाताई गुरसुडकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजभूषण भगवानराव बिडवे उर्फ अण्णासाहेब यांच्या आदेशानुसार मराठवाडा विभागीय अध्यक्ष उज्वलाताई गुरसुडकर यांनी कृष्णा कंठेवार यांची नांदेड शहर युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. नांदेड शहरातील नाभिक समाजाचे युवकांचे संघटन करून नाभिक समाज चळवळीला गती देण्याचे आणि समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कार्य करणार असल्याचे कंठेवार यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख नागनाथ महादापुरे, बालाजी गुरसुडकर, डॉ. अशोक भिसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कृष्णा कंठेवार यांच्या नियुक्तीबदल शिवसेना शहरप्रमुख गौरव भाऊ कोटगिरे व उपशहरप्रमुख विजय भाऊ खामणकर आदींनी अभिनंदन केले आहे.







