news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जल जीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ‘जल सेवा आंकलन’ उपक्रमाची होणार प्रभावी अंमलबजावणी ; ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचेही होणार मूल्यांकन

टीम लोकमन by टीम लोकमन
January 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
जल जीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ‘जल सेवा आंकलन’ उपक्रमाची होणार प्रभावी अंमलबजावणी ; ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचेही होणार मूल्यांकन

टीम लोकमन सोलापूर |

ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित, पुरेशा प्रमाणात व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी शाश्वतपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी ‘जल सेवा आंकलन’ या ग्रामपंचायतच्या नेतृत्वाखालील मूल्यांकन साधन कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

आतापर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे कार्यक्षमता मूल्यांकन ठराविक कालावधीत तृतीय पक्ष सर्वेक्षणांद्वारे करण्यात येत होते मात्र गावपातळीवरील पाणी सेवांसाठी सतत, स्थानिक मालकीची व पारदर्शक देखरेख यंत्रणा संस्थात्मक करणे आवश्यक असल्याने ‘जल सेवा आंकलन’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

जल सेवा आंकलन : संकल्पना व उद्दिष्टे

जल सेवा आंकलन म्हणजे गावातील पाणी पुरवठा सेवांची कामगिरी ग्रामपंचायत व गाव पाणी व स्वच्छता समिती यांच्या नेतृत्वाखाली पद्धतशीरपणे मूल्यांकन करणे होय. या उपक्रमाचे उद्घाटन 30 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले आहे. या मूल्यांकनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना पाणी पुरवठा नियमितपणे, पुरेशा प्रमाणात व स्वीकार्य गुणवत्तेनुसार मिळत आहे का, तक्रारींचे निवारण कसे होत आहे, वापरकर्ता शुल्क संकलनाची स्थिती, तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची संचालन व देखभाल याबाबतची माहिती नोंदविण्यात येणार आहे.

जल सेवा आंकलनची प्रमुख उद्दिष्टे

• ग्रामपंचायत व गाव पाणी व स्वच्छता समिती यांना पाणीपुरवठा योजनांच्या कामगिरीचा पद्धतशीर आढावा घेण्यासाठी सक्षम करणे.
• गावपातळीवर मालकीभावना व जबाबदारी अधिक बळकट करणे.
• पारदर्शक व समुदाय-आधारित सेवा माहितीची खात्री करणे.
• जिल्हा व राज्य पातळीवर नियोजन व सहाय्यक उपक्रमांसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध करणे.
• ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेतील शाश्वत संचालन, देखभाल व नागरिकांचा विश्वास दृढ करणे.

संस्थात्मक कार्यप्रवाह

गाव पाणी पुरवठा व स्वच्छता समिती / पाणी समितीमार्फत संचालन व देखभाल, दुरुस्ती, तक्रारी व वापरकर्ता शुल्क संकलनाची नोंद ठेवण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामसभेमध्ये पाणी पुरवठा योजनेची सर्व माहिती व निष्कर्ष मांडून त्यावर चर्चा करून पारदर्शकता राखली जाणार आहे.ग्रामपंचायत सचिव ई-ग्रामस्वराज पोर्टलवरील ‘मेरी पंचायत’ लॉगिन लिंकद्वारे पंचायत डॅशबोर्डवर अंतिम मंजूर जल सेवा अंकलन तपशील प्रविष्ट करतील.प्रविष्ट केलेली माहिती ‘मेरी पंचायत’ अँपद्वारे नागरिकांना दृश्यमान होणार असून नागरिकांकडून अभिप्राय देण्याची सुविधाही उपलब्ध असेल. तालुका पाणी व स्वच्छता मिशन कक्ष सहाय्य आवश्यक असलेल्या गावांची ओळख करून समस्या निवारणास मदत करेल, तर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हास्तरीय ट्रेंड्सचा आढावा घेऊन प्रणालीस्तरीय सुधारणा व नियोजनासाठी आवश्यक निर्णय घेईल.

तालुका प्रशासनाची भूमिका

पाणी पुरवठा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका प्रशासनाचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असून, तालुकास्तरीय समन्वय बैठकांचे आयोजन, ग्रामपंचायतींना अंमलबजावणीमध्ये सहकार्य, तसेच योजना संचालनातील अडचणी सोडविण्याची जबाबदारी तालुका प्रशासनावर असेल. ग्रामपंचायत अधिकारी व गाव पाणी व स्वच्छता समिती सदस्यांसाठी जल सेवा आंकलन फ्रेमवर्क, पंचायत डॅशबोर्डवर माहिती नोंदणी याबाबत प्रशिक्षण व क्षमता बांधणीस तालुका प्रशासनाने पाठिंबा द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मूल्यांकनाची कालमर्यादा

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी जल सेवा आंकलन मूल्यांकनाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ घोषित जिल्ह्यातील 1125 मधील 1008 गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, तालुकास्तरीय जल जीवन मिशन उपक्रमाचे सक्रिय नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे. जल सेवा आंकलन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा व अधिकारी यांनी समन्वयाने व गांभीर्याने कार्य करावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी यांनी केले आहे.

Previous Post

एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बनच्या वतीने मंगळवेढा येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न ; मंगळवेढा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचाही झाला सन्मान

Next Post

बोराळे पंचायत समिती गणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवक नेते अक्षय पवार यांच्या मातोश्री अलका पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group