टीम लोकमन मंगळवेढा |
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मंगळवेढा शाखेच्या अध्यक्षपदी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक तथा सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. श्रीनिवास कोरुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. मधुकर कुंभारे हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारतातील डॉक्टरांची खाजगी व राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. त्याची स्थापना 1928 मध्ये ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन म्हणून करण्यात आली होती मात्र 1930 मध्ये तिचे नाव इंडियन मेडिकल असोसिएशन असे ठेवण्यात आले. ही सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गत नोंदणीकृत संघटना आहे. संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनचे साडेतीन लाखांपेक्षा जास्त डॉक्टर्स सदस्य आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन मंगळवेढा शाखेच्या पदाधिकारी निवडी संदर्भात मंगळवेढा येथे डॉ. मधुकर कुंभारे यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये डॉ. श्रीनिवास कोरुलकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी फिजिशियन डॉ. सुरेश काटकर, सचिवपदी स्त्रीरोग तज्ञ डॉ. शरद शिर्के तर कोषाध्यक्षपदी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. मधुकर कुंभारे, डॉ. सुरेश होनमाने, डॉ. दत्तात्रय घोडके, डॉ. अमित कांबळे, डॉ. लक्ष्मीकांत मर्दा, डॉ. श्रीकांत मर्दा, डॉ. विजय नडगेरी, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. अमोल चव्हाण, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. आसावरी घोडके, डॉ. स्मिता नडगेरी यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.







