टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण अवघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण अवघडे यांची बिनविरोध निवड केली निवडीनंतर नूतन अध्यक्ष प्रवीण अवघडे यांचा नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश खंदारे, पेंटर सुभाष भंडारे, विक्रम अवघडे, जनार्दन अवघडे, श्रीनाथ अवघडे, शशिकांत अवघडे, अजय अवघडे, राहुल वाघमारे, यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







