news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मुहूर्त ठरला ! रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज ; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
April 12, 2024
in राजकीय
0
मुहूर्त ठरला ! रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज ; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

सोलापूर : सुरज राऊत

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ येतात. या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक १९ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
महायुतीकडून सोलापूर लोकसभा या राखीव मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे माळशिरसचे आमदार राम सातपुते तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी माढ्याचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. सातपुते आणि निंबाळकर हे दोन्ही उमेदवार येत्या मंगळवारी १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची अधिकृत माहिती आहे. विशेष बाब म्हणजे हे उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.

रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. यामुळे सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. भारतीय जनता पार्टीने हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे तर महाविकास आघाडीने हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

स्वप्नपूर्ती ! भारती धनवे यांच्या ‘दर्शनमात्रे’ या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा

Next Post

आक्रमक पवित्रा ! प्रणिती शिंदेंसाठी धर्मराज काडादी मैदानात ; ‘चिमणी’ चा बदला घेणार?

Next Post
आक्रमक पवित्रा ! प्रणिती शिंदेंसाठी धर्मराज काडादी मैदानात ; ‘चिमणी’ चा बदला घेणार?

आक्रमक पवित्रा ! प्रणिती शिंदेंसाठी धर्मराज काडादी मैदानात ; 'चिमणी' चा बदला घेणार?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group