news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

देवाभाऊ जो बोलता है.. वही करता है ! दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा आशीर्वाद द्या : देवेंद्र फडणवीस, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून फडणवीसांकडून आवताडेंची उमेदवारी जाहीर

टीम लोकमन by टीम लोकमन
October 7, 2024
in ताज्या घडामोडी
0
देवाभाऊ जो बोलता है.. वही करता है ! दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा आशीर्वाद द्या : देवेंद्र फडणवीस, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून फडणवीसांकडून आवताडेंची उमेदवारी जाहीर

टीम लोकमन मंगळवेढा |

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं मी मतदार संघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला. मी जे बोलतो ते करतोच. समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतला आहे. हा विकासाचा रथ यापुढे असाच सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केले.

ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर एमआयडीसी, कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता व तामदर्डी बंधारा या कामाचे उद्घाटन डिजिटल प्रणालीद्वारे देवेंद्र फडणवीस यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, चेतनसिंह केदार, उद्योगपती संजय आवताडे, दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, विजयसिंह देशमुख, अप्पर सचिव दीपक कपूर, गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ, सरपंच विजय माने, विनायक यादव, चांगदेव कांबळे, तानाजी काकडे, धनंजय पाटील, सुरेश भाकरे, दीपक सुडके यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाधान दादांना निवडून द्या. तुम्हाला आश्वासने अनेक मिळाली असतील पण मी मंगळवेढ्याच्या शिवारात पाणी आणून दाखवीन असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मी पूर्ण केलं असून तुम्ही तुमचं एक मत समाधानला दिल त्या समाधान आवताडेनी तुमच समाधान करून दाखविले आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवल्या आहेत. या मतदार संघावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसून हा मतदार संघ नंबर एकवर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विकासासाठी पाणी हे फार महत्त्वाचा असून पाण्याने शेती उद्योग या सर्व गोष्टी होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत.

सध्या आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे. येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास शेतीपंपाचे वीज मोफत देण्याचे आम्ही नियोजन केले आहे. एक रुपयात विमा सुरू केला आहे. लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये या सरकारने दिले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या पाठीशी तुम्ही रहा. या मतदारसंघाचे नंदनवन करुन दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

यावेळी प्रास्ताविकात बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले, मी जे जे मागेल ते तुम्ही मंजूर करून दिले आहे. विजबिल माफीचा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे या मतदारसंघातील 48 हजार लोकांना याचा लाभ झाला आहे. म्हैसाळ योजनेसाठी तुम्ही केंद्र व राज्याकडून 13 हजार कोटी रुपये दिल्यामुळे या मतदारसंघातील 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. उपसा सिंचन योजनेलाही 700 कोटी रुपये देत आज प्रत्यक्षात या कामाला तुमच्यामुळे सुरुवात होत आहे. भूगोलाच्या पुस्तकांमध्ये हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती मात्र तुमच्या या निर्णयामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात अग्रेसर तालुका म्हणून या तालुक्याची नोंद होईल.

अगोदरच्या काळात चाळीसगावची प्रादेशिक योजना अस्तित्वात आली. मात्र निकृष्ट कामामुळे तीन वर्षापासून खर्च करूनही हि योजना व्यवस्थित चालत नाही. सध्या ही योजना शिखर समितीकडे असून समितीला ही योजना चालवणे शक्य नाही. पुन्हा ती योजना एमजीबीकडे देत दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. पंढरपूर एमआयडीसी मंजूर केल्यामुळे येथील तरुणांना आता बाहेरच्या शहरात न जाता इथेच काम मिळणार आहे. आम्ही मागायला कमी पडत नाही. तुम्ही द्यायला कमी पडू नका. असे म्हणत आमदार अवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानले.

याप्रसंगी विनोद लटके,अशोक चौंडे, विकास पुजारी, प्राजक्ता बेणारे, प्रसाद कळसे, अनिल यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, शिवाजीराव नागणे, नवनाथ पवार, दिलीप चव्हाण, सचिन शिवशरण, रामेश्वर मासाळ, माजी संचालक बापूसाहेब काकेकर, चंद्रकांत पडवळे, जगन्नाथ रेवे, राजन पाटील, वृषाली पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ व भारत मुढे यांनी केले.

कार्यक्रम स्थळी ग्रामदेवतांच्या पालख्या आणि 24 गावची मातीही…

मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामदैवतांच्या पालख्या कार्यक्रम स्थळी आणून ग्रामस्थांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचबरोबर 24 गावातील माती गोळा करुन कळस पूजन ही करण्यात आले.

Previous Post

धक्कादायक ! ‘या’ नामांकित हॉस्पिटलमध्ये तरुण महिलेवर बलात्कार ; पीडित महिलेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Next Post

महाराष्ट्र भाजपचे बिग बॉस देवेंद्र फडणवीसांच्या मंगळवेढ्यातील कार्यक्रमाला प्रशांत परिचारकांची दांडी ; जिल्ह्यात चर्चांना उधान, लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट होणार, शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची शक्यता?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group