टीम लोकमन नातेपुते |
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तथा महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ दाजी ज्ञानेश्वर कोळी यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून २०२३-२४ मधील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
दाजी ज्ञानेश्वर कोळी हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणच्या माळशिरस उपविभागांमध्ये कार्यरत आहेत. महावितरण कंपनीच्या तांत्रिक विभागात सन २०२३-२४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दाजी कोळी यांनी केलेल्या अविरत व विना अपघात सेवा, सुरळीत वीज सेवा, रोहित्रांची काळजी, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्येचे त्वरित निराकरण करणे, कामाच्या ठिकाणाची देखभाल इत्यादी क्षेत्रात कर्तव्यदक्षता निष्ठा व श्रम दाखवून केलेल्या कार्याबद्दल त्यांना कामगार दिनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दाजी कोळी हे मरवडे ता. मंगळवेढा येथील रहिवासी असून ते महावितरणच्या माळशिरस उपविभाग अंतर्गत सदाशिवनगर येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दाजी कोळी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यापूर्वी देखील सन्मान झाला आहे.
त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मवीर पेडकर, कार्यकारी अभियंता अण्णासाहेब काळे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत कालेकर, कनिष्ठ अभियंता सुशांत पाचपुरे, कोळी महासंघाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजाराम कोळी, कोळी महासंघाच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ. विजया जाधव, प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, लक्ष्मण कोळी, उषा कोळी, युवक नेते सतीश शिंदे, सचिन दादा घुले, माजी सरपंच नितीन घुले, उद्योजक संतोष गणपाटील, कृषीमित्र सतीश पोतदार, झेप संवाद न्यूजचे संपादक श्रीकांत मेलगे, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, तंत्रस्नेही शिक्षक नवनाथ जाधव, नानासाहेब जाधव, युवक नेते सोमनाथ कोळी, प्राध्यापक ज्ञानेश्वर घुले, उद्योजक राजाराम येडसे, सोमनाथ येडसे, विजय घुले, भाऊसाहेब तेली, किसन रोंगे, राहुल घुले, युवक नेते निलेश स्वामी, उपसरपंच दीक्षा शिवशरण यांचेसह छत्रपती परिवाराच्या सदस्यांनी अभिनंदन केले.










