टीम लोकमन मंगळवेढा |
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने मकरसंक्रांती सणानिमित्त आज महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबच्या या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख गीता दिलीप घाडगे यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांच्यावतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. मंगळवेढा येथील संत चोखामेळानगरच्या नर्मदा पार्क येथे असणाऱ्या सैनिक भवनमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अरुणा माळी उपस्थित राहणार आहेत. सिताराम महाराज साखर कारखान्याच्या चेअरमन शोभा काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा. तेजस्विनी कदम, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर, उद्योजिका करुणा शिवशरण, शितल खंडागळे, संत चोखामेळानगरच्या माजी उपसरपंच अनिता कदम, नूतन मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे, शोभा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख गीता घाडगे यांचेसह रोटरी क्लबच्या संचालिका श्रद्धा रत्नपारखी, अबोली बने, अश्विनी रजपूत, तसनीम मुल्ला, प्रियंका मर्दा, डॉ. मेघा महिंद्रकर, महानंदा स्वामी, रूपाली इंगळे, अंजुम सय्यद, रेणुका पाटील, डॉ. स्मिता नडगेरी, डॉ. श्वेता होलेपाटील, अस्मा शेख, राखी जाधव, अंजली राजपुरोहित, पूजा जाधव, डॉ. आसावरी घोडके, दिपाली पवार, प्रियंका गोदे, प्रियंका शेजाळ, अप्सरा जावेद मुल्ला, पौर्णिमा हिरेमट यांचेसह रोटरी परिवारातील सदस्या प्रयत्नशील आहेत.
नर्मदा पार्क येथील सैनिक भवन येथे आज सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या हळदीकुंकू समारंभासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब मंगळवेढा सिटीचे अध्यक्ष अभिजीत बने, सचिव कुलदीप रजपूत, सहसचिव मेजर मल्लय्या स्वामी, आयपीपी अमोल रत्नपारखी, ट्रेझरर उमेश मर्दा, पब्लिक इमेज डायरेक्टर सोमनाथ इंगळे, मेंबरशिप डेव्हलपमेंट डायरेक्टर असिफ मुल्ला, उपाध्यक्ष डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, संचालक चंगेजखान इनामदार, विष्णू गोदे, नारायण जाधव, दिलीप घाडगे यांचेसह रोटरी क्लब मंगळवेढा सिटीच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे.










