news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कौतुकास्पद ! तळसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक विलास पाटील यांचे केंद्रप्रमुख परीक्षेत यश ; सोलापूर जिल्ह्यात 24 वे तर राज्यात 392 वे स्थान

टीम लोकमन by टीम लोकमन
March 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
कौतुकास्पद ! तळसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक विलास पाटील यांचे केंद्रप्रमुख परीक्षेत यश ; सोलापूर जिल्ह्यात 24 वे तर राज्यात 392 वे स्थान

​टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील विलास सूर्यकांत पाटील यांनी केंद्रप्रमुख पदासाठी IBPS मार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या पदाचे जुने नाव केंद्रप्रमुख असे असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार या पदाचे नाव समूह साधन केंद्र समन्वयक असे करण्यात आले आहे. नुकत्याच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत आयबीपीएस संस्थेकडून जाहीर झालेल्या निकालानुसार, या परीक्षेस एकूण 46068 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 38558 परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित होते. विलास पाटील यांनी 200 पैकी 156 गुण मिळवून जिल्ह्यामध्ये 24 वी रँक आणि राज्यामध्ये 392 वी रँक पटकावली आहे.

​विलास पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी व माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले आहे. पुणे DIET येथे डीएड चे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात नोकरीच्या सुरुवातीच्या काळात सेल टॅक्स इन्स्पेक्टर (STI) या पदाच्या परीक्षेत पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. प्राथमिक शिक्षक म्हणून नाशिक येथे दहा वर्षे सेवा करून आंतरजिल्हा बदलीने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी येथे सध्या ते गणित विषयाचे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करत त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्यामार्फत बी.एस्सी. बी.एड. (B.Sc. B.Ed.) पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना 2024 मध्ये मंगळवेढा पंचायत समितीकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

​या यशामध्ये बंधू दीपक सूर्यकांत पाटील (Assistance General Manager, Bank of Maharashtra) यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब बिचुकले, तळसंगीचे सरपंच सौ. पूजा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता दुधाळ, पंचायत समिती सदस्या मोहिनी गणपाटील, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे, केंद्रप्रमुख निवृत्ती सूर्यवंशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगीचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, केंद्रीय मुख्याध्यापक सिद्धप्पा कोळी, एकल अध्यक्ष मंच तालुका अध्यक्ष आप्पाराया न्यामगोंडे, जिल्हा सोसायटीचे संचालक तथा शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक मलगोंडे, राजेंद्र टिंगरे, भारत शिवशरण, विष्णू कुंभार, राधिका शिलेदार, सुनिता काकडे, संगीता कुलकर्णी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Previous Post

धक्कादायक ! पगार बंद केल्याने मी जीवन संपवतोय… ; 55 वर्षीय शिक्षकाची दोन पानी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

Next Post

गुढीपाडव्याच्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं, चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू ; शुभदिनी तीन तरुणांवर काळाचा घाला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group